Focus Stock : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या विचारात असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. ज्या लोकांना इन्फ्रास्ट्रक्चर सेगमेंट मधील कंपन्यांमध्ये इन्वेस्ट करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. सीगल इंडिया लिमिटेड ही कंपनी इन्फ्रास्ट्रक्चरर सेक्टरमधील आहे. पण हे वर्ष या कंपनीसाठी फारसे उत्साहावर्धक राहिलेले नाहीत.
या वर्षात कंपनीचे स्टॉक दबावात आहेत. मात्र या कंपनीसाठी आता एक गुड न्यूज समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड कडून 190 मेगावॉट क्षमतेचे सोलर फोटवोल्टाइफ पावर प्रोजेक्ट विकसित करण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे.

या मोठ्या ऑर्डरमुळे या कंपनीचे स्टॉक सोमवारी फोकस मध्ये राहणार आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना म्हणजेच सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत या प्रोजेक्टचे काम करण्यात येईल. कंपनीला मिळालेल्या या प्रोजेक्टचा EPC खर्च जीएसटी सहित 712.16 कोटी रुपये राहणार आहे.
आता ही बातमी समोर आल्यानंतर या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये येण्याची शक्यता आहे. सोमवारी या कंपनीचा शेअर्स मध्ये थोडीशी तेजी सुद्धा दिसू शकते. कंपनीने या प्रोजेक्ट बाबत स्टॉक एक्सचेंज ला माहिती दिलेली आहे. यानुसार हा प्रकल्प आपल्या राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे.
कंपनी या सौर ऊर्जा प्रकल्पांचे बांधकाम, संचालन आणि देखभाल करणार आहे. महावितरण कंपनीसोबत 25 वर्षांच्या वीज खरेदी करार (पीपीए) अंतर्गत वीजपुरवठा देखील करणार आहे. हा प्रकल्प कंपनीला फक्त दीड वर्षात पूर्ण करायचा आहे. या प्रकल्पातून 25 वर्षांसाठी अखंड वीजपुरवठा सुरु राहणार आहे.
सीगल इंडियासाठी हा कॉन्ट्रॅक्ट फारच फायद्याचा ठरणार आहे. तसेच या प्रकल्पाचा राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा लाभ मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही भागात का होईना 24 तास वीज उपलब्ध करून देण्यास यश येईल अशी आशा आहे.
सध्या या कंपनीचे स्टॉक शेअर बाजारात फारशी चांगली कामगिरी करत नाहीयेत. सीगल इंडिया लिमिटेडचे शेअर्स शुक्रवार 3 ऑक्टोबरला नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर 1.25 टक्क्यांनी घसरलेत. हा स्टॉक सध्या 260 रुपयांच्या आसपास व्यवहार करतोय.
या वर्षात आत्तापर्यंत या शेअरच्या किमतीत साधारणता 25% पर्यंत घसरण झालेली आहे. अर्थात या स्टॉकने या चालू वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना निगेटिव्ह रिटर्न दिले आहेत. पण आता कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली असल्याने येत्या काळात यातून गुंतवणूकदारांना चांगला लाभ होईल अशी आशा आहे.