शेअर बाजार हा सतत चढ-उतार होत राहणारा एक गुंतागुंतीचा खेळ आहे. योग्य संशोधन आणि संयम ठेवल्यास गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळू शकतो. काही कंपन्यांचे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात आणि त्यांना मल्टीबॅगर शेअर्स म्हणतात. असाच एक शेअर म्हणजे फोर्स मोटर्स, ज्याने दीर्घकाळात गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा दिला आहे.
फोर्स मोटर्सच्या शेअरची किंमत १६ वर्षांपूर्वी फक्त ५६.६५ रुपये होती, पण आता तो ७,४३५ रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच, जर १ लाख रुपयांची गुंतवणूक २००९ मध्ये केली असती, तर ती आज तब्बल १.३१ कोटी रुपये झाली असती. यामुळेच फोर्स मोटर्सचा शेअर दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी एका सुवर्णसंधीपेक्षा कमी नाही.

फोर्स मोटर्सच्या शेअरची वाढ
शुक्रवार, ७ मार्च २०२५ रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर फोर्स मोटर्सचा शेअर २% वाढून ७५६८ रुपये प्रति शेअरवर ट्रेड करत होता. इंट्राडे व्यवहारात त्याने ७,५८५ रुपयांच्या उच्चांकाला स्पर्श केला.
शेअरच्या वाढीबाबत पाहिल्यास गेल्या ५ वर्षांत ६४१% वाढ, गेल्या १ वर्षात १६% वाढ, गेल्या ६ महिन्यांत १% वाढ, गेल्या १ महिन्यात १४.८% वाढ, ही आकडेवारी दर्शवते की हा शेअर दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी खूप फायदेशीर ठरला आहे, मात्र अल्पकालीन व्यवहारांसाठी त्यात काही प्रमाणात अस्थिरता राहिली आहे.
लाखांचे कोटींमध्ये रूपांतर
फोर्स मोटर्स हा शेअर मल्टीबॅगर ठरला असून, दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळवून दिला आहे. शेअर बाजार हा संयम आणि योग्य नियोजनाने मोठ्या परताव्याची संधी निर्माण करू शकतो. त्यामुळे योग्य वेळी आणि योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास लाखांचे कोटींमध्ये रूपांतर होऊ शकते
फोर्स मोटर्सची आर्थिक स्थिती
फोर्स मोटर्सने आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी केली आहे. कंपनीचा निव्वळ नफा ३५% वाढून ११५.३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा महसूल ११.७% वाढून १,८८९.५ कोटी रुपये झाला आहे. वाढत्या खर्चामुळे EBITDA मार्जिन १३.३% वरून १२.३% पर्यंत घसरले. एकूण महसूल १,९०४.४ कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत ११.४% अधिक आहे.