Formula For SIP Investment:- गेल्या काही वर्षापासून सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान अर्थात एसआयपी हा पर्याय गुंतवणुकीसाठी खूप लोकप्रिय असा ठरताना दिसून येत असून तुम्हाला जर संपत्तीमध्ये ताबडतोब वाढ करायची असेल तर एसआयपी सारखा प्रभावी मार्ग नाही.
फक्त एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना तुम्ही जर काही गोष्टींची काळजी घेतली तर चक्रवाढ अर्थात कंपाऊंडिंगचा फायदा मिळून तुमचे पैसे वेगाने वाढतात व खूप मोठा फायदा तुम्हाला कमीत कमी कालावधीत देखील मिळणे शक्य आहे.त्यामुळे एसआयपीसाठी महत्त्वाचा असलेला 8-4-3-2 हा फार्मूला खूपच महत्त्वपूर्ण असून त्याचीच आपण थोडक्यात माहिती बघू.
नेमका काय आहे हा फार्मूला?
एसआयपी गुंतवणुकीसाठी व पैसे वेगात वाढवण्याकरिता चक्रवाढीचा 8-4-3-2 हा नियम किंवा फार्मूला खूप महत्त्वाचा आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर समजा तुम्ही प्रतिमाह दहा हजार रुपयांची एसआयपी केली आणि तुमची योजना तुम्हाला वर्षाला 12 टक्क्यांचा परतावा देत असेल तर पहिल्या आठ वर्षात तुमच्या संपत्तीमध्ये सोळा लाख रुपयापर्यंत वाढ होईल व पुढील चार वर्षात 16 लाख रुपयांवरून ती 32 लाख रुपयांपर्यंत वाढेल.
त्यानंतर 32 लाख रुपयांवरून 50 लाख वाढवण्यासाठी फक्त तीन वर्षे आणि 50 लाख रुपयांवरून 66 लाख रुपये वाढवण्यासाठी दोन वर्षे लागतील.
म्हणजे सोप्या भाषेत जर समजून घ्यायचे असेल तर पहिले 16 लाख रुपये जमा करण्यासाठी आठ वर्ष त्याच्यानंतर चे 16 लाख जमा करण्यासाठी चार आणि पुढील 16 लाख जमा करण्यासाठी तीन वर्ष व त्याचे पुढचे 16 लाख रुपये जमा करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन वर्षे लागतात.आता आपण जी ही आकडेवारी बघितली ती जरा व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ.
एक ते आठ वर्षापर्यंत गुंतवणूक केली तर
आता तुम्ही प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये एसआयपी आठ वर्ष कालावधीसाठी केली तर तुमची एकूण जमा रक्कम नऊ लाख साठ हजार रुपये होते व आठ वर्षानंतर तुमच्या एसआयपीचे एकूण मूल्य जवळपास 16 लाख 15 हजार रुपये होते.
एक ते पंधरा वर्षापर्यंत गुंतवणूक केली तर
यानुसार दहा हजार रुपये महिन्याला एसआयपी पंधरा वर्षांसाठी केली तर तुमची एकूण एसआयपीमध्ये रक्कम 1,800,000 रुपये होते व पंधरा वर्षानंतर याच एसआयपीचे एकूण मूल्य पाच कोटी 46 लाख रुपये इतके होते.
एक ते सतरा वर्षापर्यंतची गुंतवणूक
हिच गुंतवणूक जर तुम्ही 10,000 रुपये प्रतिमाह प्रमाणे सतरा वर्षे केली तर एकूण गुंतवणूक 20,40,000 रुपये इतके होते व 17 वर्षानंतर या एसआयपीचे एकूण मूल्य 66.79 लाख रुपये होते.म्हणजेच एक ते आठ वर्षे गुंतवणूक केली तर 16 लाख रुपये जमा झाले तर निधीमध्ये 16 लाख रुपयांची पुढील वाट 4 वर्षात होते व त्यानंतर 16 लाख रुपयांची पुढील वाढ होण्यासाठी तीन वर्षे लागतात.
जर तुम्ही पंधरा वर्षानंतर देखील तुमची गुंतवणूक टिकवून ठेवली तर चक्रवाढीची खरी जादू तुम्हाला पाहायला मिळते व पूर्वीप्रमाणेच तुम्ही गुंतवणूक नियमितपणे करत राहिला तर पुढील सोळा लाख रुपये उभारण्यासाठी फक्त दोन वर्ष लागतात.
याच प्रमाणे तुम्ही तुमची गुंतवणूक पंचवीस वर्षे सुरू ठेवली तर तुमच्याकडे दोन कोटी रुपये जमा होतील. फक्त याकरिता तुम्हाला फक्त ज्या योजनेत वार्षिक परतावा 12 टक्के असेल अशा योजनेमध्ये महिन्याला दहा हजार रुपये गुंतवावे लागतील.
कंपाउंडिंग म्हणजे नेमके काय?
जेव्हा आपण पैशांची गुंतवणूक करतो तेव्हा मिळणारा परतावा किंवा मिळणारे व्याज हे दोन प्रकारे जोडता येऊ शकते. यामध्ये साधे व्याज किंवा परतावा म्हणजेच आपण जमा केलेल्या रकमेला व्याज जोडले जाते व दुसरे म्हणजे चक्रवाढ व्याज जिथे परतावा केवळ आपण जमा केलेल्या मूळ रकमेतच नव्हे तर त्यावर मिळणाऱ्या व्याजात जोडला जातो.
उदाहरणाने जर समजून घेतले तर एक लाख गुंतवणूक केली आणि एका वर्षानंतर दहा हजार रुपये व्याज असेल तर मूळ रकमेत व्याज जोडल्यास ती रक्कम एक लाख दहा हजार रुपये होते व पुढील व्याज एक लाखावर न जोडता ते एक लाख दहा हजार रुपयांवर मोजले जाते व ही प्रक्रिया अशीच सुरू राहते व त्यामुळे चक्रवाढीचा म्हणजेच कंपाऊंडिंगचा फायदा मिळून संपत्ती वेगात वाढते.