Senior Citizen : DCB पासून ICICI पर्यंत FD वर मिळत आहेत भरघोस रिटर्न्स! बघा एफडीवरील व्याजदर…

Published on -

Senior Citizen : जेष्ठ नागरिकांसाठी ही बातमी महत्वाची आहे. आज आम्ही अशा बँकांची यादी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्या सध्या आपल्या एफडीवर सार्वधिक व्याजदर ऑफर करत आहेत.

सध्या, खाजगी क्षेत्रातील अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर उत्कृष्ट व्याजदर देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर 8.1 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात आहे. हा व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर दिला जात आहे. कोणत्या खाजगी बँकां ज्येष्ठ नागरिकांना FD वर 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देत आहेत, पाहूया…

DCB बँक

DCB बँक ज्येष्ठ नागरिकांना FD वर 8.1 टक्के व्याज देत आहे. हे व्याज 26 महिने ते 37 महिन्यांच्या मुदतीच्या FD वर दिले जात आहे. अशा प्रकारे पाहिल्यास, या FD मधील तुमचे पैसे 8.8 वर्षांत दुप्पट होतील.

RBL बँक

RBL बँक ज्येष्ठ नागरिकांना FD वर ८ टक्के व्याज देत आहे. हे व्याज ज्येष्ठ नागरिकांना 24 महिने ते 36 महिन्यांच्या कालावधीसाठी केलेल्या एफडीवर दिले जात आहे. RBL बँकेत तुमची FD रक्कम दुप्पट होण्यासाठी 9 वर्षे लागतील.

इंडसइंड बँक

इंडसइंड बँक ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर ८ टक्के व्याज देत आहे. हा व्याजदर 2 वर्षे 9 महिने ते 3 वर्षे 3 महिन्यांच्या कालावधीसाठी FD वर दिला जात आहे. अशा प्रकारे, जर तुम्ही इंडसइंड बँकेत ज्येष्ठ नागरिकाची एफडी केली तर तुमचे पैसे 9 वर्षांत दुप्पट होतील.

IDFC बँक

IDFC बँक ज्येष्ठ नागरिक FD वर 7.75 टक्के व्याज देत आहे. ही ऑफर 2 वर्ष, 1 दिवस ते 3 वर्षांपर्यंतच्या FD वर दिली जात आहे. जर तुम्ही या FD मध्ये पैसे गुंतवले तर तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी 9.2 वर्षे लागतील.

ICICI बँक

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ICICI बँकेत ज्येष्ठ नागरिकांची FD देखील करू शकता. येथे तुम्हाला ७.५ टक्के व्याजदर दिला जात आहे. हा दर 2 वर्षे, 1 दिवस ते 3 वर्षांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या FD वर दिला जात आहे. या FD मधील तुमचे पैसे 9.6 वर्षात दुप्पट होतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News