Zodiac Sign : ऑक्टोबर महिना काही लोकांसाठी विशेष खास ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती व त्यांच्या हालचालींमुळे ऑक्टोबर महिन्यात काही लोकांचे नशीब चमकणार आहे. पुढील महिन्यात नीचभंग राजयोग तयार होतोय ज्यामुळे अनेकांच्या मनातील सुप्त इच्छा पूर्ण होणार आहेत. हा योग काही राशींसाठी अत्यंत शुभ मानला जात आहे. या संबंधितांना करिअर, व्यवसाय आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील असा दावा केला जातोय. 17 ऑक्टोबरला सूर्यदेव तुळ राशीत भ्रमण करणार आहे. सूर्यदेवामुळे नीचभंग राजयोगाची निर्मिती होणार आहे. याचा प्रभाव राशीचक्रातील सर्वचं राशींवर दिसून येऊ शकतो. पण याचे शुभ परिणाम राशीचक्रातील तीन महत्त्वाच्या राशीच्या लोकांना मिळतील.
कन्या राशीसाठी हा योग अत्यंत फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. सूर्यदेव मंगळाच्या मेष राशीत उच्चस्थानी असल्यामुळे आणि मंगळ दहाव्या घरात असल्यामुळे कन्या राशीच्या जातकांना नोकरीत व व्यवसायात प्रगतीची चांगली संधी मिळणार आहे. या काळात व्यावसायिकांना आर्थिक लाभ, व्यवसाय विस्तार तर नोकरी करणाऱ्यांना समाजात मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे.

तूळ राशीच्या जातकांसाठीही हा काळ उत्साहवर्धक ठरणार आहे. कारण नीचभंग राजयोग तुमच्या लग्नभावात तयार होणार असल्याने आत्मविश्वास दुपटीने वाढेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखी राहील. भागीदारीतले काम लाभदायक ठरेल. तर अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल आणि आखलेल्या योजना यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे.
वृषभ राशीसाठीदेखील हा योग चांगली बातमी घेऊन येत आहे. शुक्र मध्यस्थानी असून सूर्य सहाव्या घरात स्थित असल्यामुळे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना महत्त्वाच्या प्रकल्पात संधी मिळेल तर व्यावसायिकांना हुशार निर्णयांचा लाभ होईल. प्रतिष्ठा आणि मान-सन्मानही वाढेल.
थोडक्यात नीचभंग राजयोगाचा कन्या, तूळ व वृषभ राशीच्या जातकांना चांगला लाभ मिळणार आहे. या लोकांचे झोपलेले नशिबात चमकणार आहे. येत्या काळात हे लोक आर्थिक, शिक्षण, लग्न, करिअर, व्यवसाय अशा सर्वच बाबींमध्ये चांगली कामगिरी करणार आहेत. हा काळ आयुष्यात नवीन संधीं घेऊन येणार आहे.