35 रुपयांवरून थेट 379 रुपयांवर; अनिल अंबानीच्या शेअरने केली कमाल! कारण की…

Published on -

Reliance Infra Share Price:- आज शेअर बाजारात एक महत्त्वाची बातमी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकडून समोर आली. कंपनीने येस बँकेचे सर्व कर्ज फेडल्याची घोषणा केली आणि त्यानंतर बाजारात तिच्या शेअरच्या किमतीतही चांगली उसळी पाहायला मिळाली. गेल्या काही महिन्यांपासून या कंपनीचे शेअर्स सातत्याने वाढत आहेत आणि आजची बातमी या प्रवासात आणखी एक सकारात्मक पायरी ठरली आहे.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने येस बँकेचे फेडले कर्ज

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने येस बँकेकडील तब्बल २७३ कोटी रुपयांचे कर्ज ज्यामध्ये मूळ रक्कम आणि व्याज दोन्हीचा समावेश आहे ते पूर्णपणे परतफेड केल्याची माहिती सोमवारी जाहीर केली. हे कर्ज त्यांच्या पूर्ण मालकीच्या जेआर टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर होते. यासाठी रिलायन्स इन्फ्राने कॉर्पोरेट हमीदार म्हणून येस बँकेसोबतच्या सेटलमेंट कराराच्या अटी मान्य करत परिशिष्टावर स्वाक्षरी केली. यामुळे कंपनीवरचा आर्थिक बोजा थोडा हलका झाला असून, गुंतवणूकदारांचा विश्वासही वाढला आहे.

शेअर्स बाजारामध्ये दिसून आला सकारात्मक परिणाम

या घोषणेनंतर रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स बीएसईमध्ये ३७९ रुपयांवर पोहोचले. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांमध्येच या कंपनीच्या शेअर्समध्ये ४१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी याच शेअरची किंमत २१३.३५ रुपये इतकी होती, तर आज ती जवळपास दुपटीने वाढली आहे. एक वर्षाच्या कालखंडात कंपनीच्या शेअर्सनी ७७ टक्क्यांची उडी घेतली आहे. इतकेच नव्हे, तर गेल्या पाच वर्षात हा शेअर जवळपास ९७७ टक्क्यांनी वाढला आहे. २०२० मध्ये केवळ ३५.१५ रुपयांवर असलेला हा शेअर आज ३७९ रुपयांवर आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, या शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ४२१ रुपये असून नीचांकी पातळी १६९.७५ रुपये आहे. या वाढीचा अंदाज घेतला तर स्पष्ट होते की, कंपनीने आर्थिकदृष्ट्या बऱ्याच अडचणींवर मात करत बाजारात आपली मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे.येस बँकेबद्दल बोलायचं झालं, तर सोमवारी तिचे शेअर्स १९.९१ रुपयांवर व्यवहार करत होते. जेव्हा कर्ज परतफेड होते, तेव्हा कर्जदात्या बँकेचाही आत्मविश्वास वाढतो आणि त्यामुळे अशा बातम्यांचा फायदा दोन्ही कंपन्यांना होताना दिसतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!