Garlic Price : लसूण झाला महाग ! किरकोळ बाजारात तब्बल ४०० रूपये भाव

Published on -

यंदा मान्सूनच्या पावसाने ऐनवेळी दगा दिल्याने इतर पिकांसोबतच लसणाची देखील लागवड कमी प्रमाणात झाली होती. परिणामी उत्पादनाम मोठी तूट आली आहे. त्यातच परत आक्टोबर नोव्हेंबरमध्ये अवकाळीचा फटका बसला.

त्यात मोठ्या प्रमाणावर शेतमालाचे नुकसान झाले, यात लसणाचे देखील पीक भुईसपाट झाले होते. त्यामुळे यंदा लसणाचे उत्पादन कमी झाले असून अद्याप नवीन लसूण बाजारात येण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

त्यामुळे बाजारात लसणाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने लसणाचे दर चांगलेच वाढलेले आहेत. बाजार समितीत क्विंटलसाठी २५००० तर तर किरकोळ बाजारात तब्बल ४०० रूपये भाव मिळत आहे. त्यापाठोपाठ इतर भाजीपाल्याची देखील चांगलीच दरवाढ झाली आहे.

यंदा पावसाचे प्रमाण सरसरीच्या तुलनेत कमी झाले. त्यामुळे अनेक भागात सध्या पाणी टंचाई सुरू झाली आहे. त्यामुळे शहरात बाहेरून येणारा भाजीपाला कमी येत आहे. अनेकजण चांगला दर मिळत असल्याने आपला माल थेट दुसऱ्या जिल्ह्यात पाठवतात त्यामुळे भाजीपाल्याची आवक घटत असून मागणी वाढल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत.

अवकाळी झोडपल्याने अनेक भागातील शेतकऱ्यांची शेतात असलेली पिके सडली, काही उद्ध्वस्त झाली. त्यामुळे नवीन भाज्यांची लागवड अत्यंत कमी प्रमाणात झाली. परत सध्या पाणी टंचाईचे संकट लक्षात घेता अनेकांनी भाज्यांची लागवड करणे टाळले. त्यामुळे भाज्यांचे दर वधारले आहेत.

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले दर टोमॅटो ६०० २०००, वांगी १५०० ७०००, फ्लावर ७००- ४०००, कोबी ७०० १५००, काकडी ६०० २२००, गवार ३००० – ८०००, घोसाळे २५०० ३५००, दोडका २५०० – ६०००, कारले २५०० – ६०००, कारले २५०० ६०००, भेंडी २००० – ७५००, वाल ३००० – ५५००, घेवडा ३५००-६०००, तोंडुळे २००० २५००, डिंगरी ३५०० ५०००,

बटाटे ९०० – १७००, लसूण ७००० २५०००, हिरवी मिरची २००० ४०००, आवळा १५००- २२००, शेवगा २००० – ७०००, लिंबू ८००- २०००, आद्रक ६००० – ९०००, दु.भोपळा १००० ३५००, शिमला मिरची १५००-४५००, मेथी ४००० – ८०००, कोथिंबीर २४०० – ४०००, पालक ३६००, करडी भाजी ३०००, मुळे ३००० ७५००, कांदा पात १५०० – २४००.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe