GB Logistic IPO:- शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढताना दिसून येत असून अगदी ग्रामीण भागातील लोक देखील आता शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देत आहेत. जरी शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीची असली तरी देखील गुंतवणूक तज्ञांची मदत घेऊन आणि स्वतःचा अभ्यास या माध्यमातून अनेक गुंतवणूकदार शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करुन चांगला परतावा मिळवताना आपल्याला पाहायला मिळतात.
मार्केटमध्ये गुंतवणुकीचे जे प्रकार आहेत त्यामध्ये विविध कंपन्यांचे आयपीओ देखील महत्त्वाचे असतात व अशा आयपीओमध्ये केलेली गुंतवणूक देखील फायद्याची ठरते. बाजारामध्ये कायम वेगवेगळ्या कंपन्यांचे आयपीओ लॉन्च होत असतात व याकरिता बऱ्याचदा गुंतवणूकदारांची खरेदीसाठी गर्दी होते.
याच पद्धतीने आज म्हणजे 24 जानेवारीपासून जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे व या आयपीओच्या माध्यमातून ही कंपनी 25.07 कोटी रुपयांचा निधी उभारणार असल्याची माहिती समोर आली आहे. या आयपीओच्या माध्यमातून जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स लिमिटेड कंपनी तब्बल 24.58 लाख नवीन शेअर्स जारी करणार आहे.
किती आहे या आयपीओची प्राईस बँड?
जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स लिमिटेड कंपनीने या आयपीओकरिता 95 ते 102 रुपयांचा प्राईस बँड निश्चित केला आहे. रिटेल गुंतवणूकदारांना या आयपीओच्या एका लॉटमध्ये 1200 शेअर्स मिळतील व रिटेल गुंतवणूकदारांना यामध्ये एक लाख 22 हजार 400 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
या आयपीओमध्ये 50% सार्वजनिक ऑफर पात्र संस्थात्मक खरेदीदार, पस्तीस टक्के हिस्सा रिटेल गुंतवणूकदारांसाठी आणि उरलेला 15 टक्क्यांचा हिस्सा हा संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असणार आहे.
जीबी लॉजिस्टिक्स कंपनी कुठल्या क्षेत्रात आहे कार्यरत?
ही कंपनी लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये कार्यरत असून उच्च क्षमतेच्या वाहतुकीसाठी फ्लेक्सिबल नेटवर्क सेवा प्रदान करण्यामध्ये या कंपनीचे विशेष योगदान आहे. तसेच ही कंपनी मोठे आणि मध्यम आकाराच्या ग्राहकांना पूर्ण ट्रक लोड मालवाहतूक सेवा देखील पुरवते.
जेबी लॉजिस्टिक्स कॉमर्स कंपनीची एकूण आर्थिक परिस्थिती बघितली तर या कंपनीचे एकूण उत्पन्न 2024 मध्ये 115.63 कोटी रु होते व करोत्तर नफा 4.86 कोटी रुपये होता. 30 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या कालावधीमध्ये या कंपनीचे एकूण उत्पन्न 50.85 कोटी रुपये होते तर करोत्तर नफा 2.53 कोटी रुपये होता.
ग्रे मार्केटमध्ये करणार धमाल
ग्रे मार्केटशी संबंधित असलेल्या तज्ञांनी आयपीओबद्दल महत्वाची अपडेट दिली व त्यानुसार जर बघितले तर ग्रे मार्केट म्हणजेच अनलिस्टेड मार्केटमध्ये जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स कंपनी आयपीओ शेअरचा जीएमपी 21 रुपये आहे व तो त्याच्या प्राईस बँड पेक्षा 20.5 टक्क्यांनी जास्त आहे. तसेच हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होण्याअगोदरच त्याचा जीएमपी शून्यावरून 21 रुपयांवर पोहोचला आहे.
या आयपीओ संबंधी नोट करा महत्त्वाच्या तारखा
जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स कंपनी आयपीओ 24 जानेवारी ते 28 जानेवारी असे चार दिवस गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे 29 जानेवारीला शेअर्स वाटप निश्चित होईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स कंपनीचे शेअर्स 30 जानेवारी रोजी पात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यामध्ये जमा केले जातील व 31 जानेवारी रोजी बीएससी एसएमई वर हा शेअर्स लिस्ट होण्याची शक्यता आहे.