10 शेअर्सवर मिळणार थेट 50 बोनस शेअर्स! बजाज फायनान्सचा बोनस मिळवायचा असेल तर हे वाचा

Published on -

Bajaj Finance Share Bonus:- आजचा दिवस बजाज फायनान्सच्या गुंतवणूकदारांसाठी विशेष ठरला. कारण, बोनस शेअर्स मिळवायचे असतील तर आज म्हणजे १३ जून हा शेवटचा दिवस होता ज्यादिवशी कंपनीचे शेअर्स खरेदी करणे आवश्यक होते. त्यामुळे बाजारात सकाळपासूनच या शेअरकडे गुंतवणूकदारांचा कल वाढलेला दिसून आला.

बजाज फायनान्सने जाहीर केले बोनस शेअर

बजाज फायनान्सने अलीकडेच मोठा निर्णय घेतला व तो म्हणजे कंपनीने ४:१ प्रमाणात बोनस शेअर्स जाहीर केले आहेत. म्हणजेच तुमच्याकडे जर एक शेअर असेल, तर त्यावर चार नवीन बोनस शेअर्स मिळतील. एवढ्यावरच न थांबता कंपनीने स्टॉक स्प्लिटचीही घोषणा केली आहे. यानुसार, २ रुपयांच्या दर्शनी मूल्याचा प्रत्येक शेअर आता दोन शेअर्समध्ये विभागला जाईल, ज्याचे दर्शनी मूल्य प्रत्येकी १ रुपया असेल.

यासाठीची रेकॉर्ड डेट काय?

या बोनस आणि स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट १६ जून ठेवण्यात आली आहे. मात्र भारतातील T+1 सेटलमेंट सिस्टिमनुसार, गुंतवणूकदारांनी किमान एक दिवस आधी, म्हणजे १३ जूनपर्यंतच शेअर्स खरेदी केले पाहिजेत. त्यामुळे जे आज बजाज फायनान्सचे शेअर्स घेतात, तेच या लाभांसाठी पात्र ठरतील. उदाहरणार्थ, जर एखाद्याकडे आज १० शेअर्स असतील, तर बोनसनंतर त्याच्या खात्यात एकूण ५० शेअर्स होतील. मात्र, शेअर्सची संख्या वाढली म्हणून गुंतवणुकीचे एकूण मूल्य तसंच राहील. कारण बाजार शेअरची किंमत त्या प्रमाणात समायोजित करेल.

बजाज फायनान्सची कामगिरी कशी?

कंपनीच्या कामगिरीकडे पाहिलं, तर मार्च तिमाहीत बजाज फायनान्सचा निव्वळ नफा १६% वाढून ३,९४० कोटी रुपये झाला आहे. ही कामगिरी समाधानकारक असली, तरी बाजारातील काही तज्ज्ञांच्या अपेक्षेपेक्षा ती थोडीशी कमी आहे. ब्लूमबर्गने अंदाज व्यक्त केला होता की नफा ४,२३० कोटी रुपयांपर्यंत जाईल. मात्र, निव्वळ व्याज उत्पन्नामध्ये २१% वाढ झाली आहे. हे उत्पन्न ८,९१० कोटी रुपये होतं, जे मागील वर्षीच्या तुलनेत चांगलंच अधिक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News