PM Svanidhi Scheme : मोदी सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत घरबसल्या मिळवा 50,000 रुपयांचे कर्ज, बघा पात्रता…

Published on -

PM Svanidhi Scheme : कोरोना संकटाच्या काळात मोदी सरकारने भारतात एक योजना सुरू केली होती, जी आता चांगलीच लोकप्रिय झाली आहे. कारण या योजनेत तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय मिळते. ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी आहे, ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे. या सरकारी योजनेचे नाव पीएम स्वानिधी योजना असे आहे.

ही सरकारी योजना खासकरून रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी आहे, ज्यांच्या कोरोना महामारीदरम्यान मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. अशा लोकांना मदत करण्यासाठी सरकारने पीएम स्वानिधी योजना सुरू केली. मात्र या योजनेचे यश पाहून सरकारने त्याची व्याप्ती वाढवली आहे. या योजनेंतर्गत रोजगार सुरू करण्यासाठी सरकार कोणत्याही हमीशिवाय कर्ज देत आहे.

पंतप्रधान स्वानिधी योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि फास्ट फूडची छोटी दुकाने चालवणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

केंद्र सरकार पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देते. पण 50 हजार रुपयांचे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमची विश्वासार्हता निर्माण करावी लागेल. या योजनेअंतर्गत कोणालाही 10,000 रुपयांचे पहिले कर्ज मिळेल. एकदा कर्जाची परतफेड केल्यानंतर दुप्पट रक्कम दुसऱ्यांदा कर्ज म्हणून घेता येते.

50 हजारांचे कर्ज कसे मिळवायचे?

समजा एखाद्याला बाजारात रस्त्याच्या कडेला चाटचे दुकान लावायचे आहे. त्यासाठी त्यांनी स्वानिधी योजनेंतर्गत 10 हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर त्यांनी कर्जाची रक्कम वेळेवर परत केली.

अशा परिस्थितीत ती व्यक्ती दुसऱ्यांदा या योजनेअंतर्गत 20 हजार रुपयांचे कर्ज घेऊ शकते. त्याचप्रमाणे तिसऱ्यांदा 50 हजार रुपयांच्या कर्जासाठी तो पात्र ठरणार आहे. या योजनेची विशेष बाब म्हणजे सरकार कर्जावर सबसिडी देखील देते.

या सरकारी योजनेंतर्गत कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हमीची गरज नाही. कर्जाचा अर्ज मंजूर झाल्यानंतर, कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात तीन वेळा हस्तांतरित केली जाते. रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी कॅश-बॅकसह डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने या योजनेच्या बजेटमध्ये वाढ केली होती.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :-

प्रधानमंत्री स्वानिधी योजनेंतर्गत घेतलेल्या कर्जाची रक्कम एका वर्षाच्या कालावधीत परत केली जाऊ शकते. तुम्ही दरमहा कर्जाची रक्कम हप्त्यांमध्ये परत करू शकता. पीएम स्वानिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कोणत्याही सरकारी बँकेत अर्ज करता येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe