एफडीवर जास्त व्याज मिळवून लवकर होता येईल श्रीमंत! ‘या’ 3 सरकारी बँका देतात जास्त व्याज, वाचा व्याजदर

Ahmednagarlive24 office
Published:

Government Bank FD Interest Rate:- प्रत्येकाला सुखी आणि पैशांच्या दृष्टिकोनातून समृद्ध आयुष्य जगायला आवडते व त्याकरिता गुंतवणूक ही सर्वात महत्त्वाची बाब आहे व तुमच्या सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे.

गुंतवणूक करताना योग्य व जोखीम मुक्त पर्यायाची निवड ही खूप फायद्याचे ठरते. केलेली गुंतवणूक सुरक्षित रहावी आणि चांगला परतावा मिळावा या दृष्टिकोनातून बँकांच्या मुदत ठेव योजनांना खूप महत्त्व दिले जाते गुंतवणूकदारांमध्ये या योजना लोकप्रिय देखील आहेत.

त्यातल्या त्यात बरेच गुंतवणूकदार हे सरकारी बँकांच्या एफडी योजनांना प्राधान्य देतात. यामध्ये सरकारी बँकांची एफडी जर बघितली तर यामध्ये पैसे सुरक्षित राहतात आणि तुम्हाला परतावा देखील चांगला मिळतो.

या अनुषंगाने तुम्हाला जर सरकारी बँकेत एफडी करून जास्त व्याज मिळवायचे असेल तर आपण या लेखात बघणार आहोत की कोणत्या सरकारी बँकेत एफडीवर सर्वाधिक व्याज मिळते.

या सरकारी बँकात एफडी केल्यावर मिळतो सर्वाधिक व्याज

1- स्टेट बँक ऑफ इंडिया- स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह सहकारी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडियाकडे वेगवेगळ्या कालावधी आणि व्याजदरांसह अनेक मुदत ठेव योजना सध्या उपलब्ध आहेत. यापैकी एसबीआय अमृत वृष्टी योजना विशेष आकर्षक योजना आहे.

जर तुम्ही या योजनेअंतर्गत 444 दिवस एफडी करत असाल तर या योजनेत तुम्हाला 7.75% पर्यंत व्याज मिळू शकते. त्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची सुरक्षितता आणि चांगला परतावा हवा असेल असे गुंतवणूकदार या योजनेचा पर्याय म्हणून निवड करू शकतात.

2- पंजाब नॅशनल बँक- या यादीमध्ये जर आपण बघितलं तर दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून पंजाब नॅशनल बँक ओळखली जाते. या बँकेत जर मुदत ठेव म्हणजे एफडी केली तर त्यावर उत्कृष्ट व्याजदर मिळतो.

पंजाब नॅशनल बँक सात दिवसांपासून ते दहा वर्षाच्या कालावधी करिता मुदत ठेव योजना ऑफर करते. या अंतर्गत सामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध व्याजदर 3.50% ते 7.25 टक्के पर्यंत आहे. तसे ज्येष्ठ नागरिकांना चार टक्क्यांपासून ते 7.75 टक्क्यांपर्यंत व्याज मिळतो.

तसेच अति ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर आणखी जास्त असून त्यांना 4.30 टक्क्यांपासून ते 8.05% पर्यंत व्याजदर मिळतो. जर तुम्ही चारशे दिवसांसाठी एफडी करत असाल तर ही योजना विशेष फायदेशीर आहे. पंजाब नॅशनल बँकेचे व्याजदर गुंतवणूकदारांसाठी एक उत्कृष्ट असा पर्याय आहे.

3- बँक ऑफ बडोदा- बँक ऑफ बडोदा ही देशातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक आहे. अलीकडेच बँक ऑफ बडोदाने मान्सून धमाका एफडी योजना सुरू केली होती व ज्यामध्ये 333 दिवसांच्या कालावधीच्या एफडीवर 7.50% व्याजदर दिला जात होता.

तसेच सामान्य ग्राहकांना 360 दिवसाच्या एफडीवर 7.10% व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांना त्याच कालावधीसाठी 7.60% व्याज दिले जाते. बँक ऑफ बडोदाच्या या योजना विशेषतः ज्यांना मध्य मुदतीसाठी सुरक्षित गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी फायदेशीर आहेत.

 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe