लग्न हे खूप महत्त्वाचे असून लग्न हे दोन जीवांचेच नाहीतर दोन कुटुंबाचे देखील ते एक मिलन असते. लग्नामुळे दोन कुटुंबे, दोन परिवार जवळ येतात व त्यामध्ये आयुष्यभरासाठी एक अतुट असे प्रेमाचे नाते निर्माण होते. तसेच सामाजिक दृष्टिकोनातून देखील लग्नाला खूप महत्त्व आहे व भारतामध्ये लग्न हे एक पवित्र बंधन मानले जाते.
सामाजिक दृष्टिकोनातून लग्न हे महत्त्वाचे आहेच परंतु जर आपण लग्नाच्या माध्यमातून मिळणारे आर्थिक फायदे म्हणजेच आर्थिक बाजू पाहिली तर ती देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
कारण भारतामध्ये जर आपण आयकर नियम पाहिला तर त्यामध्ये पती-पत्नी यांना दोघांना काही बाबतीत आयकारातून सूट देण्यात येते व त्यामुळे इन्कम टॅक्स मधून लाखो रुपये वाचवण्याची एक सुवर्णसंधीच मिळते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे या लेखामध्ये आपण लग्नानंतर आर्थिक दृष्टिकोनातून कोणते फायदे मिळतात? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.
लग्नामुळे कशा पद्धतीने वाचू शकतो इन्कम टॅक्स?
1- होमलोनच्या संदर्भात– जर आपण आयकर कायदा पाहिला तर होमलोनच्या मुद्दल आणि व्याजाच्या रकमेवर करामध्ये सुट मिळते. यामध्ये जर पाहिले तर लग्न झालेल्या म्हणजेच विवाहित व्यक्तींना खूप मोठा फायदा या माध्यमातून मिळवता येतो.
जर पती-पत्नी मिळून संयुक्तपणे होमलोन घेतले असेल तर आयकर कलम 80 सी अंतर्गत होमलोनच्या प्रिन्सिपल अमाऊंट पेमेंट वर मिळणारे दीड लाखांची सुट ऐवजी तब्बल तीन लाखांपर्यंत सूट मिळते. तुम्ही जर लग्न केल्यानंतर होम लोन घेतलं असेल तर 24 बी नुसार होमलोनच्या दोन लाखापर्यंतच्या व्याज भरपाई वर कर सुट दुप्पट होते. म्हणजे लग्नामुळे तुम्ही प्रत्येक वर्षाला चार लाख रुपये पर्यंत इन्कम टॅक्स मध्ये सवलत मिळवू शकतात.
2- हेल्थ इन्शुरन्स– इन्कम टॅक्सच्या माध्यमातून आरोग्य विमा घेतला असेल तर त्यावर देखील करामध्ये सूट मिळते. यामध्ये 80 डी अंतर्गत पती किंवा पत्नी या दोन्हीपैकी कोणी कामावर असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त 25 हजार रुपये पर्यंत प्रीमियम पेमेंट वर सूट दिली जाते. जर दोघेही कामावर असतील तर 50 हजारापर्यंत यामध्ये सूट मिळते.
3- मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून– या पद्धतीच्या कर सवलतीचा फायदा हा विवाहित व्यक्तींनाच मिळत असतो. जर 80 C अंतर्गत पती आणि पत्नी दोघेही करदाते असतील तर त्यांना मुलांच्या शिक्षणाकरिता एकूण कराच्या सवलतीची मर्यादा तीन लाखापर्यंत मिळते.
4- एलटीए अर्थात लीव्ह ट्रॅव्हल अलाउन्स– समजा पती व पत्नी दोघेही नोकरीवर आहेत व दोघे देखील नोकरी करत आहे तर अशा जोडप्याला चार वर्षाच्या कालावधीत लिव्ह ट्रॅव्हल्स अलाउन्सचा फायदा मिळतो व या चार वर्षाच्या कालावधीत आठ टूर एन्जॉय करता येऊ शकतात. या एलटीएच्या पैशांवर देखील तुम्ही इन्कम टॅक्स वाचवू शकतात. यामध्ये कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही.