Gold Buying Tips : देशात लवकरच दीपोत्सवाचा मोठा सोहळा संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण आहे. दीपोत्सवाला अनेक जण सोने-चांदीचे नवीन दागिने खरेदी करतात. दिवाळीत सोने किंवा चांदी खरेदी करणे फारच शुभ असल्याचे मानले जाते. तसेच अनेक जण गेल्या काही वर्षात सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगले रिटर्न मिळाले असल्याने गुंतवणूक म्हणूनही सोने खरेदी करतात.
पण दिवाळीआधीच सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात सोने खरेदीची तयारी करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसतोय. सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर 1,28,395 प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,64,660 प्रति तोळा या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे.

मागणी वाढल्याने बाजारात भाव आणखी वाढण्याची शक्यता सुद्धा आहे. सोने नेहमीच सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. मात्र, सध्याच्या उच्च किमतींच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी सोन्याची शुद्धता आणि हॉलमार्क तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
अनेक वेळा उच्च मागणीचा फायदा घेत काही ज्वेलर्स बाजारभावापेक्षा जास्त दर आकारतात. त्यामुळे ज्वेलर्सकडून किंमतींची तुलना करून खरेदी करणे फायदेशीर ठरते. पण सोने खरेदी करताना काही गोष्टींची काळजी सुद्धा घेणे आवश्यक आहे.
दरम्यान आज आपण याच संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोने खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याच बाबतचा आजचा आपला हा लेख राहणार आहे. भारतामध्ये सोन्याच्या दागिन्यांवर भारतीय मानक ब्युरो (BIS) हॉलमार्क असणे बंधनकारक आहे.
या हॉलमार्कवरतीन प्रमुख चिन्हे असतात — BIS लोगो, कॅरेट किंवा फाइननेसने दर्शवलेली शुद्धता आणि ज्वेलरचा ओळख क्रमांक (ID). ग्राहकांनी हे चिन्हे नीट तपासणे आवश्यक आहे. सोन्याची अस्सलता पडताळण्यासाठी ‘BIS Care’ ॲप देखील उपलब्ध आहे.
ॲपमध्ये दागिन्यांवरील 6-अंकी HUID (Hallmark Unique Identification) नंबर टाकल्यास सोन्याची शुद्धता, ज्वेलरचे नाव आणि हॉलमार्किंग केंद्राची माहिती मिळते. तसेच बिलामध्ये वस्तूचे वर्णन, वजन, शुद्धता आणि हॉलमार्किंग शुल्क स्पष्ट नमूद असावे.
याशिवाय, मॅग्नेट टेस्ट किंवा प्रमाणित केंद्रावर XRF मशीन टेस्ट करूनही सोन्याची शुद्धता तपासता येते. सणासुदीच्या काळात सोने खरेदी करताना या सोप्या पद्धतींचा वापर करून ग्राहक सुरक्षित, शुद्ध आणि विश्वासार्ह खरेदी सुनिश्चित करू शकतात.