Gold Investment : गुंतवणुकीसाठी सोनं ठरतंय उत्तम पर्याय, मिळेल इतका रिटर्न…

Ahmednagarlive24 office
Published:

Gold Investment : सोने हा गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय ठरतो. सोने केवळ आर्थिक संकटातच उपयुक्त नाही, तर आपल्याला याच्या गुंतवणुकीमधून उत्तम गुंतवणूकदारांना परतावा देखील मिळतो. यामुळे सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक ही अत्यंत फायदेशीर ठरते.

दरम्यान, भारतीयांमध्ये सोने खरेदी करण्याचे प्रमाण हे जास्त प्रमाणात आहे. मात्र फक्त अलंकार म्हणून सोन्याकडे न पाहता गुंतवणुकीच्या दृष्टीने याकडे पहिले तर येत्या काळात सोने हे आर्थिकदृष्ट्या फायदे देणारे ठरेल.

दरम्यान, गेल्या दिवाळीपासून आतापर्यंत गुंतवणूक केलेल्या सोन्यामध्ये एकूण 20 टक्के परतावा मिळाला आहे. दरम्यान, येत्या वर्षांमध्ये सोन्यामधून उत्तम परतावा मिल्ने हे अपेक्षित आहे. दरम्यान, पुढील एका वर्षात सोने सुमारे 19 टक्के परतावा देऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी लावला आहे.

1947 मध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत फक्त 88.62 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. यानुसार, स्वातंत्र्यानंतर, सोन्याने 67,953 टक्के इतका परतावा दिला आहे. जर तुम्ही 1947 मध्ये 1 लाख रुपयांचे सोने खरेदी केले असते तर आज या सोन्याची किंमत ही सुमरे 6.79 कोटी रुपये इतकी असते.

स्मॉलकेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या विंडमिल कॅपिटलने केलेल्या अभ्यासात हे उघड झाले आहे. अभ्यासात असे म्हटले आहे की सोने ही एक उत्तम मालमत्ता आहे. जी महागाईच्या काळात तुम्हाला आर्थिक पाठबळ देते. त्यामुळे सोन्याचा समावेश असलेल्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करणे चांगले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe