Gold Price : नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना एक गुड न्यूज मिळाली आहे. ही बातमी नव्याने सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी अधिक खास राहणार आहे. आज एक नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात पुन्हा एक मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे नागरिकांना आता पुन्हा एकदा स्वस्तात दागिने खरेदी करण्याची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
खरंतर यावर्षी इतिहासात पहिल्यांदाच सोने एका लाखाच्या पुढे गेले आहे. त्यातल्या त्यात गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचे दर सतत वाढत आहेत. अखेर आज शनिवारी (1 नोव्हेंबर 2025) सोन्याच्या भावात घट झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ज्या लोकांना नव्याने सोने खरेदी करायचे आहे त्यांच्यासाठी ही नक्कीच एक मोठी दिलासाची बातमी राहणार आहे. दरम्यान आज आपण एक नोव्हेंबर रोजी एक तोळा सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागतात याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
कशा आहेत किंमती
24 कॅरेट सोन्याच्या दरात 2800 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली असून, आता हा दर 12,32,800 रुपयांवरून 12,30,000 रुपयांपर्यंत खाली आला आहे. म्हणजेच 10 ग्रॅम 24 कॅरेट सोनं आता 1,23,000 रुपये इतकं मिळत आहे, जे पूर्वी 1,23,280 रुपये होतं.
मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर 1,23,000 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 1,12,750 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली असून, 100 ग्रॅम दर 11,30,000 रुपयांवरून 11,27,500 रुपयांपर्यंत कमी झाला आहे.
यामुळे 10 ग्रॅम 22 कॅरेट सोनं 1,13,000 रुपयांऐवजी आता 1,12,750 रुपयांना मिळत आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 100 ग्रॅमसाठी 2,100 रुपयांनी घटला असून, तो आता 9,22,500 रुपये झाला आहे. 10 ग्रॅमसाठी या सोन्याचा दर 92,250 रुपये इतका आहे.
दरम्यान, सोन्याच्या भावात घसरण झालेली असली तरी चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. चांदीचा दर प्रति किलो 1,52,000 रुपयांवर पोहोचला असून, बाजारात चांदीत तेजीचे वातावरण आहे.
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील डॉलरमधील हालचाली, मध्यपूर्वेतील तणाव आणि गुंतवणूकदारांची मागणी या घटकांमुळे दरांमध्ये चढ-उतार होत आहेत. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत पुन्हा दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.













