Gold Price Prediction:- सध्या जर आपण बघितले तर सोने आणि चांदीच्या दराने विक्रमी पातळी गाठली असून सोने देखील दुसऱ्या दिवस उच्चांक गाठताना दिसून येत आहे. यामध्ये प्रसिद्ध गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्सने सोन्याच्या किमतीत अंदाजे 50% वाढ होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेले राजकीय तणाव आणि आर्थिक अनिश्चितता या सगळ्यांचा परिणाम हा सोन्याच्या दरवाढीवर होऊन सोने येणाऱ्या काळात विक्रमी पातळीवर पोहोचण्याची शक्यता असल्याचे मत या बँकेने व्यक्त केले आहे.
दुसरे म्हणजे ब्रोकरेज फर्म पीएल कॅपिटलचे संचालक संदीप रायचूर यांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याचे दर सध्या सुमारे 114,000 प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवरून प्रति दहा ग्रॅम एक लाख 44 हजार पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 23 सप्टेंबर 2025 रोजी अमेरिकन स्पॉट गोल्ड प्रति दहा ग्रॅम एक लाख तेरा हजार आठशेच्या वर पोहोचले व ही पातळी जवळपास दोन वर्षांपूर्वीच्या पातळीपेक्षा दुप्पट होती.

सोन्याच्या दरवाढी मागील प्रमुख कारणे
सोन्याच्या दरवाढी मागील जर प्रमुख कारणे बघितले तर यामध्ये जगभरातील प्रमुख मध्यवर्ती बँकांनी डॉलर वरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने सोन्याची खरेदी वाढवल्याने सोन्याला मागणी वाटली आहे व त्यामुळे दरवाढ होत आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक धोरणांमुळे देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्थिरता दिसून येत आहे. सध्या अमेरिकेच्या धोरणांबद्दल अनिश्चितता असून फेडरल रिझर्वच्या हस्तक्षेपाची चर्चा डॉलर बॉण्ड बाजाराला कमकुवत करते व यामुळे देखील गुंतवणूकदार सुरक्षित आश्रयस्थान शोधतात व सोन्याकडे सध्या झुकताना दिसून येत आहेत.
त्यामुळे देखील येणाऱ्या काळात सोन्याचे दरवाढ होण्याची शक्यता आहे. तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे क्रिप्टोच्या अस्थिरतेमुळे आणि कडक नियमांच्या भीतीमुळे गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करत आहेत. तसेच गेल्या काही वर्षांपासून शेअर मार्केट मधून देखील कमी परतावा मिळत असल्यामुळे अनेक जण सोन्याकडे वळले आहेत. त्यामुळे सोन्याची मागणी वाढत असून किमती वाढत आहेत. यामागील चौथे कारण जर बघितले तर अनेक देश डॉलरचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत व त्या प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांच्या आर्थिक मॉडेलमध्ये बदल करत आहेत.
तसेच महत्त्वाचे म्हणजे सध्या अमेरिकेचे कर्ज वाढत असून डॉलर कमकुवत होत आहे व जेव्हा डॉलर कमकुवत होतो तेव्हा सोन्याच्या किमती वाढतात. पाचवे महत्त्वाचे कारण म्हणजे सोने कधीही निरुपयोगी नसते व ते अविनाशी आहे. तसेच त्याची उपलब्धता मर्यादित प्रमाणात असल्याने आणि चलनवाढीच्या काळात त्याचे मूल्य टिकून राहते. त्यामुळे दीर्घकालासाठी सोने जर सोबत राहिले तर त्या आर्थिक दृष्टिकोनातून फायदेशीर ठरते. या सगळ्या कारणांमुळे येणाऱ्या काळात सोन्यात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.