यावर्षी सोन्याच्या किमतीत 70% आणि चांदीच्या किमतीत 150 टक्क्यांची वाढ ; 2026 मध्ये सोन आणखी किती वाढणार ?

Gold Price : 2025 हे वर्ष शेअर मार्केट आणि शेअर मार्केट अशी निगडित असणाऱ्या म्युच्युअल फंड साठी चॅलेंजिंग राहिले आहे. या वर्षात अनेक गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावे लागले आहे.

शेअर मार्केटची चढ-उतार गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय राहिली. त्याचवेळी 2025 हे वर्ष सोने आणि चांदी साठी फारच अनुकूल ठरले असून आत्तापर्यंत सोन्यात आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न मिळाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी आत्तापर्यंत सोन्याचे किमतीत 70% ची आणि चांदीच्या किमतीत 150 टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता 2026 मध्ये स्थिती कशी राहणार सोन्याच्या किमती किती वाढू शकतात,

हा मोठा सवाल गुंतवणूकदारांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान याच बाबत एक महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे आणि आज आपण या अहवालाची डिटेल या ठिकाणी समजून घेणार आहोत.

सोन्याच्या रेटमध्ये आणखी वाढ होणार का ?

सध्या स्थितीला भारतीय बाजारपेठेत 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 42 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅमच्या रेंजमध्ये आहे. चांदीबाबत बोलायचं झालं तर चांदीची किंमत प्रति किलो सव्वा दोन लाख रुपये पर्यंत पोहोचली आहे. यावर्षी चांदीने सोन्यापेक्षा अधिक रिटर्न दिले आहेत.

यामुळे पुढे स्थिती काय राहणार हा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे. आतापर्यंत ज्याने सोन्यात आणि चांदीत गुंतवणूक केली त्यांची ‘चांदी’ झाली, पण 2026 मध्ये पण असच राहणार की सोन्याचे आणि चांदीचे भाव कमी होणार? याबाबत मोठी अस्वस्थता गुंतवणूकदारांमध्ये आहे.

1979 नंतर प्रथमच सोने आणि चांदी मध्ये एवढी मोठी वाढ झालेली आहे. अनेक दशकानंतर या मौल्यवान धातूच्या किमती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याने या किमती पुन्हा त्याच गतीने कोसळू शकतात अशी भीती गुंतवणूकदारांना आहे.

सोन्याची आणि चांदीची किंमत वाढण्यामागे वेगवेगळे कारण आहेत. चांदीची मागणी औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने चांदीचे रेट वाढत आहेत. याशिवाय इतरही काही ग्लोबल फॅक्टर या दरवाढीसाठी कारणीभूत आहेत.

अमेरिकेचे टेरिफ धोरण, भूराजकीय तणाव अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे चांदीचे रेट वाढतायेत. सोन्याचे रेट वाढीसाठी देखील वेगवेगळे फॅक्टर कारणीभूत आहेत. ढोबळमानाने भूराजकीय तणाव, अमेरिकेचे वित्तीय धोरण, केंद्रीय बँकांनी केलेली सोन्याची खरेदी आणि गोल्ड ईटीएफ मधील वाढती गुंतवणूक यामुळे सोन्याच्या किमती वाढत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

साहजिकच या भाव वाढीमागे अजूनही अनेक फॅक्टर असू शकतात. आता हे सर्व फॅक्टर एकाच वेळी ट्रिगर झाल्याने सोन्याची आणि चांदीची किंमत ऐतिहासिक पातळीवर जाऊन पोहोचली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे जगप्रसिद्ध गुंतवणूक बँक गोल्डमॅन सॅक्सने 2025 प्रमाणेच 2026 मध्ये सुद्धा सोन्याच्या किमतीत अशीच घोडदौड सुरू राहण्याची शक्यता वर्तवली आहे. या संस्थेच्या अंदाजानुसार 2026 मध्ये सोन्याचे रेट 4900 डॉलर्स प्रति औंस पर्यंत जाऊ शकतात.