Gold Price : सध्या सगळीकडे नवरात्र उत्सवाचे धूम सुरू आहे. नवरात्र उत्सव आता अंतिम टप्प्यात आलाय. या शुभ मुहूर्तावर अनेक जण सोने-चांदी खरेदी करतात.
दरम्यान जर तुमचाही सोन्यात किंवा चांदीत गुंतवणूक करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. भारतीय परंपरेनुसार दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते.

त्यामुळे दिवाळीला अनेक जण सोन्या-चांदीचे दागिने बनवतात. काही लोक गुंतवणूक म्हणूनच सोने चांदी खरेदी करतात. यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये बाजारात या मौल्यवान धातूंची मोठी मागणी पाहायला मिळते. मागणी वाढत असल्याने दिवाळीत सोन्याच्या किमतीही वाढतात.
पण, या वर्षी समीकरण थोडे उलट पडणार आहे. सोन्याच्या किमतींच्या हालचालीबाबत आता अनिश्चितता वाढली आहे. केडिया कॅपिटलचे संस्थापक आणि बाजारतज्ज्ञ अजय केडिया यांनी पुढील काही महिने सोन्याच्या किमतीत घसरण होऊ शकते असा अंदाज दिला आहे.
गेल्या वर्षभरात सोन्याने 50% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. त्यामुळे सध्या ते “ओव्हरव्हॅल्यू” अवस्थेत आहे. येत्या 3-4 महिन्यांत या मौल्यवान धातूच्या किमतीत थोडी घसरण होण्याची शक्यता आहे. दिल्लीत 24 कॅरेट सोनं 1,16,700 रुपये प्रति तोळा या भावात उपलब्ध आहे.
तसेच सध्याची स्थिती पाहता पुढील काही दिवस पिवळ्या धातूच्या किमती कमी होत राहणार आहेत. आता याच्या किंमतीत मोठी तेजी फक्त जिओपॉलिटिकल परिस्थिती बिघडल्यास किंवा अमेरिकेकडून भारतावर नवीन व्यापार निर्बंध आल्यासच येणार असा अंदाज आहे.
चांदीच्या बाबतीत मात्र वेगळी स्थिती आहे. 26 सप्टेंबर रोजी दिल्ली बाजारात 1 किलो चांदीचा दर 1,41,700 होता. केडिया यांच्या मते, चांदीच्या किमतीत मोठी घसरण होणार नाही. कारण उत्पादन मर्यादित असतानाच इलेक्ट्रिक वाहनं आणि ऊर्जा क्षेत्रातील मागणी सतत वाढत आहे.
त्यामुळे चांदीचे दर स्थिर किंवा किंचित वाढलेले राहू शकतात. आता सोन्यात गुंतवणूक करावी की नाही? हा महत्त्वाचा सवाल आहे. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की ज्यांना लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनी बिनधास्त गुंतवणूक करावी.
पण ज्या लोकांना शॉर्ट टर्म मध्ये पैसे गुंतवायचे असतील त्यांनी आत्ता सोने खरेदी करणे टाळणे आवश्यक आहे. कारण पुढील तीन-चार महिन्यात सोन्याच्या किमती कमी होणार आहेत. चांदीची मागणी मात्र भक्कम राहणार असून किमतीही तशाच राहतील.