सोने सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर जाणार ! ‘इतक्या’ वर्षांनी एका तोळ्यासाठी 3.61 लाख रुपये मोजावे लागतील

Gold Rate : भारतात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. त्यातीलच एक पूर्वापार चालत आलेला पर्याय म्हणजे सोने. देशात सुरक्षित गुंतवणुकीसाठी ऑफिसच्या बचत योजना तसेच बँकांच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. याशिवाय अनेक जण सोने-चांदी मध्ये गुंतवणूक करतात.

प्रामुख्याने महिला मंडळी सोन्यात गुंतवणूक करण्याला विशेष प्राधान्य दाखवतात. दरम्यान जर तुम्हीही सोन्यामध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे.

नजीकच्या भविष्यात सोन्याच्या किमती कितपत वाढू शकतात याचा एक नवीन अंदाज समूहाला आहे. येत्या सात वर्षांनी सोन्याचे दर काय राहणार याबाबत स्विस आशिया या संस्थेने एक नवीन अंदाज वर्तवला आहे.

आज एक तोळा सोना खरेदीसाठी साधारणता 1.10 लाख रुपये खर्च करावा लागतोय. अर्थात सोन्याची किंमत ही आत्ताच सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर आहे. या मौल्यवान धातूच्या वाढत्या किमतीमुळे अनेकजण आता सोना खरेदी करावं की नंतर करावं अशा विचारात अडकले आहेत.

सोन्याच्या किमती कमी होतील का की अशाच वाढत राहतील हाही प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे. अशातच आता स्विस आशिया या संस्थेने येत्या सात वर्षात सोन्याच्या किमतीत 229 टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज दिला आहे.

2032 पर्यंत सोन्याच्या किमती 119% – 229 टक्क्यांनी वाढू शकतात. सोन्याच्या किमतीत जर 119 टक्क्यांनी वाढ झाली तर एक तोळा सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना दोन लाख 40 हजार 900 रुपये मोजावे लागणार आहेत.

पण जर सोन्याच्या किमती 229 टक्क्यांनी वाढल्या तर एक तोळा सोने खरेदी करण्यासाठी तीन लाख 61 हजार 900 रुपये मोजावे लागणार आहेत. हा एक अंदाज आहे.

सोन्याच्या किमती येत्या सात वर्षांनी इतक्या वाढतीलच हे सांगता येत नाही. पण या अहवालात सांगितल्याप्रमाणे सोन्याच्या किमती खरंच इतक्या वाढल्यात तर सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करणे दुरापास्त होणार आहे.