Gold Rate : सोन खरेदीच्या तयारीत असणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 2025 हे वर्ष सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी अधिक खास ठरले आहे. या वर्षात सोन्याने आणि चांदीने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.
मात्र 2026 हे वर्ष सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी निराशा जनक राहू शकते असा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे आणि यामुळे गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली आहे.

अशा स्थितीत आता आपण हा अहवाल नेमका काय सांगतो , या अहवालात काय म्हटले आहे आणि 2026 मध्ये सोन्याच्या किमती किती कमी होऊ शकतात याचाच एकच सविस्तर आढावा येथे घेणार आहोत.
सोन्याच्या किमतीत किती घसरण होणार?
सोन्याच्या किमतींबाबत गुंतवणूकदारांसाठी मोठा इशारा देण्यात आला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की 2026 मध्ये सोन्याच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होण्याची शक्यता आहे. 2025 हे वर्ष सोन्याच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरले.
वर्षाच्या सुरुवातीला सुमारे 76,500 रुपये प्रति 10 ग्रॅम असलेले 24 कॅरेट सोनं एप्रिल 2025 मध्ये प्रथमच एक लाखांच्या पुढे गेले आणि त्यानंतरच्या कालावधीतही वेगाने वाढत डिसेंबरच्या अखेरीस जवळपास 1.39 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी पातळीवर पोहोचले.
केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याने ऐतिहासिक वाढ नोंदवली असून ही वाढ 1979 नंतरची सर्वात मोठी वाढ मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर 2026 मध्ये सोन्याची चमक कायम राहणार का, की घसरणीचा ट्रेंड दिसणार, हा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर उभा राहिला आहे.
काही तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किमती सध्याच्या उच्च पातळीवरून काही प्रमाणात खाली येऊ शकतात. जागतिक अर्थव्यवस्था सशक्त झाली, अमेरिकन डॉलर मजबूत राहिला आणि व्याजदर उच्च स्तरावर टिकले तर सोन्यावर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
अशा वेळी सोन्यातील गुंतवणूक काही काळ सावधगिरीने करण्याचा सल्ला दिला जात आहे. दुसरीकडे काही तज्ञ अजूनही सोन्याबाबत सकारात्मक आहेत. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने भविष्यात सोन्याच्या किमतींमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे.
जागतिक अनिश्चितता कायम राहिली, भू-राजकीय तणाव वाढले, महागाई उच्च राहिली आणि प्रमुख देशांनी व्याजदर कमी केले तर सोन्याला पुन्हा मोठा आधार मिळू शकतो. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे मोठ्या प्रमाणात वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोन्याच्या किमतींवर महागाई, व्याजदर, डॉलरची हालचाल, आंतरराष्ट्रीय आर्थिक वातावरण आणि भू-राजकीय घडामोडी यांचा थेट परिणाम होत असतो. त्यामुळे 2026 हे वर्ष सोन्याच्या किमतींसाठी निर्णायक ठरू शकते.
गुंतवणूकदारांनी भावनांवर न चालता बाजारातील परिस्थिती, तज्ज्ञांचे विश्लेषण आणि स्वतःची गुंतवणूक क्षमता लक्षात घेऊन निर्णय घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.