सोन्याच्या किमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण होणार ! सोन्याचे रेट 40 टक्क्यांपर्यंत कमी होतील ? गुंतवणूकदारांची चिंता वाढली

Published on -

Gold Rate : अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फारच वाढली आहे. आधी गुंतवणुकीसाठी सोन्या – चांदीला अधिक महत्त्व दिले जात होते. नंतर प्लॉट, जमीन अशा स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले जाऊ लागले.

पण आजही अनेक लोक सोन्यात गुंतवणूक करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. या मौल्यवान धातूच्या किमती दोन वर्षांपूर्वी एका लाखाच्या वर जाणार असा विचार सुद्धा कोणी केला नसेल.

पण आज सोन्याची किंमत प्रति तोळा एक लाख 13 हजार रुपयांवर पोहोचली आहे. महत्वाचे बाब म्हणजे काही तज्ञांना हा पिवळा धातू आणखी महाग होईल असे वाटत आहे. दुसरीकडे चांदी देखील गतकाही वर्षांमध्ये गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरले आहे.

एक किलो चांदीचा दर दीड लाख रुपयांवर पोहोचला आहे. अशा स्थितीत जर तुम्हाला येत्या काळात सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर आजची बातमी तुमच्या कामाचे ठरणार आहे.

आज सोने सव्वा लाखाच्या घरात आहे आणि या वर्षाच्या अखेरीस दीड लाख प्रति तोळापर्यंत पोहोचेल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. डॉलर मधील घसरण, जिओ पोलिटिकल तणाव अशा काही प्रमुख घटनांमुळे गोल्ड चे रेट सतत वाढत आहेत.

जगभरातील सेंट्रल बँक सोन्याची खरेदी वाढवत आहेत. परिणामी पिवळ्या धातूच्या किमतीला बळ मिळाले आहे. या मौल्यवान धातूची किंमत गेल्या सहा वर्षात तिप्पट झाली आहे.

महत्वाची बाब म्हणजे या वर्षात आत्तापर्यंत सोन्याची किंमत 40 टक्क्यांनी वधारली आहे. अर्थात सोन्याने देखील शेअर मार्केट सारखे जबरदस्त रिटर्न दिले आहेत. सहा महिन्यातच सोन्यात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार लखपती झाले आहेत.

पण सोन्याच्या किमतीत जशा रेकॉर्ड ब्रेक वाढत आहेत ती सगळी परिस्थिती पाहता सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या मनात हा फुगा फुटणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनकडून सोने, क्रिप्टो आणि शेअर बाजारातील फुगा येत्या काळात फुटू शकतो असा अंदाज देण्यात आला आहे.

हे सर्व ऍसेट्स आता रेकॉर्ड स्तरावर आहेत. यामुळे हा फुगा कधीतरी फुटण्याची शक्यता आहेच. साहजिकच यामुळे गुंतवणूकदारांना येत्या काळात काही नुकसानही सहन करावे लागू शकते.

पण काही तज्ञांकडून येत्या काळात सोन्याच्या किमती 2 लाख रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचू शकतात असा अंदाज दिला जातोय. सध्याची स्थिती भाव वाढीसाठी अनुकूलच आहे. पण आज सोन्याची किंमत ज्या रेंजमध्ये आहे त्यावरून हा फुगा कधीही फुटू शकतो ही शक्यता नाकारून चालणार नाही. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News