सोन सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार ! एक तोळा सोन खरेदी करण्यासाठी मोजावे लागणार तब्बल 300000 रुपये

Published on -

Gold Rate : 2025 हे वर्ष सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खास ठरले आहे. या वर्षात सोन्याने आणि चांदीने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिलाय आणि यामुळे अनेक जण सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्याकडे आकर्षित होत आहेत.

अशातच आता सोन्याबाबत सर्वसामान्यांना हादरवून टाकणारी एक भविष्यवाणी समोर आली आहे. जर ही भविष्यवाणी खरी ठरली तर सोने नक्कीच सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर जाणार आहे.

सध्या स्थितीला सोन्याची किंमत एक लाख 41 हजार रुपये प्रति तोळा यादरम्यान आहे. मात्र काही तज्ञांनी सोन्याची ही किंमत आणखी वाढणार असा अंदाज दिलाय आणि सोने खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांपासून लांब जाणार असे दिसते.

सोन्याच्या किमतींबाबत बोलायचं झालं तर सोने दररोज वाढत आहे. 2025 मध्ये पहिल्यांदा सोन्याच्या किमतीने एक लाख रुपयांचा टप्पा पार केला आणि आता जवळपास सोनं दीड लाख रुपयांच्या घरात पोहोचलय. पण लवकरच ही किंमत दुप्पट होणार आहे.

काही तज्ञांनी सोन्याच्या किमती बाबत मोठी भविष्यवाणी करत प्रति तोळा सोन खरेदी करण्यासाठी सर्वसामान्य ग्राहकांना तीन लाख रुपयांपर्यंतचा पैसा मोजावा लागणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.

अशा स्थितीत आज आपण ही भविष्यवाणी नेमकी कोणी केली आणि याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार ? याविषयी डिटेल माहिती आजच्या या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

कोणी केली भविष्यवाणी?

सोन प्रति तोळा तीन लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना हादरवून सोडणारी ही भविष्यवाणी अमेरिकेचे प्रसिद्ध अर्थशास्त्री ईडी यार्डेनी यांनी केली.

आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 41 हजार रुपये प्रति 10 g एवढी आहे. मात्र भविष्यात ही किंमत तीन लाख रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे. 2029 पर्यंत सोने 10 हजार डॉलर्स प्रति औंसवर पोहोचणार असा अंदाज अर्थशास्त्री ईडी यार्डेनी यांनी व्यक्त केला आहे आणि त्यांच्या या अंदाजामुळे सध्या सर्वसामान्य ग्राहकांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळत आहे.

कारण त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरल्यास नक्कीच सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणे सोप राहणार नाही. सध्या जागतिक बाजारात सोन्याचा भाव 4410 डॉलर्स प्रति औंस इतका आहे.

पण यार्डेनी यांची भविष्यवाणी खरी ठरली तर सोने 2029 पर्यंत 3.08 लाख रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचू शकते. म्हणजेच 2029 पर्यंत सोन्याच्या किमतीत 129 टक्क्यांनी वाढ होणार असा अंदाज दिला जातोय.

याचाच अर्थ पुढच्या तीन-चार वर्षात सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. पण अर्थतज्ज्ञांचा हा अंदाज कितपत खरा ठरतो हे पाहण्यासारखे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe