Gold Rate:- सोन्याच्या किमतींमध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे सामान्य ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी ५०,००० रुपये प्रति १० ग्रॅम असलेले सोने आता ८२,००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीपर्यंत पोहोचले आहे.
यामुळे, ज्यांनी सोने खरेदी करण्याचा विचार केला होता, त्यांच्यासाठी ही वाढ एक धक्का ठरली आहे. लग्नसमारंभ किंवा इतर खास प्रसंगांसाठी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही दरवाढ अतिशय निराशाजनक ठरले आहेत.
सोन्याच्या किमतीतील ही अचानक वाढ बाजारातील अनिश्चिततेचे आणि गडबडीचे दर्शक आहे. लोकांची अपेक्षा होती की,सोन्याचे दर स्थिर राहतील किंवा कमी होतील. पण त्याऐवजी ते अधिक महाग झाले. यामुळे अनेक ग्राहकांनी सोनं खरेदी करण्याचे टाळले आणि ते अनेक महिन्यांनी पुढे ढकलले.
विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी सोने खरेदी करणे शक्यच नाही असे दिसत आहे. महागाईच्या आणि आर्थिक ताण-तणावांच्या परिस्थितीत सामान्य जनतेसाठी सोनं खरेदी करणे एक अवघड काम बनले आहे.
सोन्याच्या किमतीमध्ये होऊ शकते आणखी वाढ
सोनं ही पारंपारिक आणि सुरक्षित गुंतवणूक मानली जात असली तरी, त्याच्या किमतींमध्ये होणारी वादळी वाढ आर्थिक परिस्थितीला प्रतिबिंबित करते. जागतिक स्तरावर आर्थिक मंदी, डॉलरच्या किमतीतील चढ-उतार आणि जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता या सर्व गोष्टींमुळे सोने महाग झालं आहे. भारतीय बाजारात सोन्याची मागणी उच्च आहे, त्यामुळे किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोन्याची खरेदी गेली सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर
या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे सोने खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. उच्च उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी सोने खरेदी करणे थोडं सोप्पं असलं तरी, सामान्य कुटुंबांसाठी हे अत्यंत अवघड झाले आहे.
यामुळे काही लोक आर्थिक परिस्थितीत सोने खरेदी करण्याऐवजी इतर सुरक्षित गुंतवणूक पर्यायांचा विचार करत आहेत. त्यामुळे सोन्याच्या किमतींची स्थिती सामान्य नागरिकांसाठी कठीण बनली आहे.
जरी सोनं एक पारंपारिक आणि आकर्षक गुंतवणूक असलं तरी, सध्याच्या किमतींमुळे सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या घटली आहे. अनेकांना ‘अब की बार सोने…’ अशा आशा होत्या. पण किमतींमध्ये असलेली झालेली प्रचंड वाढ त्यांच्या अपेक्षांना धक्का देत आहे. अशा परिस्थितीत, सामान्य ग्राहकांना सोनं खरेदी करणे म्हणजे एक मोठा आर्थिक निर्णय बनले असून जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट झाली आहे.