Gold Rate Today:- सोन्याच्या दरांनी आज पुन्हा नवा उच्चांक गाठला असून ग्राहकांना आणखी खरेदी करण्यासाठी जास्त खर्च करावा लागणार आहे. गुरुवारी सराफा बाजारात ८३,८०० रुपये प्रति १० ग्रॅम हा विक्रमी दर नोंदवला गेला. सलग दुसऱ्या दिवशी या मौल्यवान धातूच्या किमतीत वाढ झाली असून जागतिक बाजारपेठेतील मजबूत कल याला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ
ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार ९९.९% शुद्ध सोन्याचा दर ५० रुपयांनी वाढून ८३,८०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. बुधवारी हा दर ८३,७५० रुपये होता.
त्याचप्रमाणे, ९९.५% शुद्धतेचे सोनेही ५० रुपयांनी वाढून ८३,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. मागील व्यवहारात हा दर ८३,३५० रुपये होता. या सततच्या वाढीमुळे सोन्याच्या गुंतवणूकदारांना चांगला फायदा होत आहे. मात्र दागिने खरेदी करणाऱ्यांना हा मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
सोने-चांदीच्या वायदे दरांमध्ये चढ-उतार
वर्षाचा पहिला महिना संपत असताना सोन्याचे दर सातत्याने वाढताना दिसत आहेत. मल्टी-कमोडिटी एक्सचेंज वर फेब्रुवारी महिन्याच्या सोन्याच्या वायदे दरानेही वेग घेतला आहे. सकाळी १०.०५ वाजता हा दर ४२७ रुपयांच्या वाढीसह ८२,०१४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला.
मागील व्यवहारात तो ८१,७२३ रुपयांवर बंद झाला होता आणि आज ८२,०३९ रुपयांवर उघडला. दुसरीकडे चांदीच्या दरात घसरण झाली असून सध्या चांदी ९२,१११ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. मागील उच्चांकी दरांच्या तुलनेत चांदीचे दर आता काहीसे स्वस्त झाले आहेत, त्यामुळे गुंतवणुकीसाठी हा योग्य काळ ठरू शकतो.
देशांतर्गत सराफा बाजारातील सोन्याची किंमत
भारतीय बाजारपेठेतही सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ८४,३३० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ७७,३३० रुपये आहे. याशिवाय भारतीय ग्राहकांसाठी आज चांदी ९९,५५० रुपये प्रति किलोग्रॅम या दराने उपलब्ध आहे.
२२ कॅरेट सोन्याचा आजचा दर (प्रति १० ग्रॅम)
मुंबई
आजचा दर ७७,३३० रुपये
कालचा दर ७६,१०० रुपये
पुणे
आजचा दर ७७,३३० रुपये
कालचा दर ७६,१०० रुपये
नागपूर
आजचा दर ७७,३३० रुपये
कालचा दर ७६,१०० रुपये
कोल्हापूर
आजचा दर ७७,३३० रुपये
कालचा दर ७६,१०० रुपये
जळगाव
आजचा दर ७७,३३० रुपये
कालचा दर ७६,१०० रुपये
ठाणे
आजचा दर ७७,३३० रुपये
कालचा दर ७६,१०० रुपये
२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर (प्रति १० ग्रॅम)
मुंबई
आजचा दर ८४,३३० रुपये
कालचा दर ८३,०२० रुपये
पुणे
आजचा दर ८४,३३० रुपये
कालचा दर ८३,०२० रुपये
नागपूर
आजचा दर ८४,३३० रुपये
कालचा दर ८३,०२० रुपये
कोल्हापूर
आजचा दर ८४,३३० रुपये
कालचा दर ८३,०२० रुपये
जळगाव
आजचा दर ८४,३३० रुपये
कालचा दर ८३,०२० रुपये
ठाणे
आजचा दर ८४,३३० रुपये
कालचा दर ८३,०२० रुपये
सोन्याच्या दरात वाढीचे कारण
सोन्याच्या किमतीवर आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीचा मोठा प्रभाव पडतो. अमेरिका आणि युरोपमधील महागाई दर, डॉलरच्या किमतीतील चढ-उतार आणि व्याजदर धोरणे या घटकांमुळे भारतीय बाजारातही सोन्याच्या दरात सतत वाढ होत आहे.
तसेच अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जात असल्याने त्याच्या किमतीत वाढ झाल्याचे तज्ज्ञ सांगतात.
पुढील काही दिवसांत सोन्याचे दर कसे राहू शकतात?
अर्थसंकल्प जाहीर होण्याच्या आधी आणि नंतरही सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय ट्रेंड लक्षात ठेवून पुढील काही दिवसांत निर्णय घ्यावा.
सोने महाग झाल्यामुळे सामान्य ग्राहकांना मोठा फटका बसणार असला तरी गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला संधीचा काळ ठरू शकतो.