Gold Rate Today:- गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितले तर सोने-चांदीच्या दरांनी मोठी भरारी घेतली असून गेल्या काही दिवसांमध्ये एक लाखाचा टप्पा पार केलेला आहे. त्यामुळे सोने-चांदीचे खरेदीदार आणि गुंतवणूकदार यांना मात्र खूप मोठ्या आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आज 11 सप्टेंबर 2025 रोजी जर आपण सोन्या आणि चांदीचे दर बघितले तर सोन्याच्या दरात आज परत एकदा वाढ पाहायला मिळत असून चांदीच्या दरात मात्र घसरण झाल्याचे दिसून येत आहे. चला तर मग या लेखामध्ये आपण 11 सप्टेंबर 2025 रोजी देशामध्ये सोन्या आणि चांदीचे दर कशा पद्धतीचे आहेत या संबंधीची माहिती बघू.
देशातील सोन्या-चांदीचे दर
आज 11 सप्टेंबर 2025 रोजी जर आपण सोन्या चांदीचे दर बघितले तर ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत सोन्याचा भाव एक लाख 13 हजार रुपये प्रति तोळा म्हणजेच
दहा ग्रॅम वर पोहोचला आहे. तर चांदी मात्र 300 रुपयांनी तिच्या उच्चांकावरून घसरली आहे. यामध्ये इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनची वेबसाईट बघितली तर त्यानुसार बुधवारी दहा ग्रॅम सोन्याचे दर एक लाख 9 हजार 635 रुपये इतके होते तर चांदीच्या दरात थोडीशी घसरण पाहायला मिळाली होती व एक लाख 24 हजार 594 रुपये प्रति किलो दराने चांदी विकली जात होती.

आज सकाळचे प्रति दहा ग्राम सोन्याचे दर
आज 11 सप्टेंबर 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर एक लाख 9 हजार 635 रुपये असून 22 कॅरेट सोने खरेदी करण्यासाठी आज एक लाख 426 रुपये लागणार आहेत. तसेच आज 18 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रामचा दर 82226 रुपये इतका आहे. त्यासोबतच 23 कॅरेट सोने खरेदी करायचे असेल आजचा दर एक लाख 9 हजार 116 रुपये इतका आहे.
सोन्याच्या दरवाढीमागील कारणे कोणती?
सोन्याच्या दरारावर जर परिणाम करणारे घटक बघितले तर यामध्ये जागतिक बाजारपेठेतील चढ-उतार तर कारणीभूत असतेच. परंतु त्यासोबत डॉलरची परिस्थिती तसेच आयातीचा खर्च, बँकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर, आर्थिक स्थिरता, हंगामी किमती, महागाई आणि मागणी-पुरवठा इत्यादींचा यामध्ये समावेश होतो. समजा चलनवाढीचा दर जर जास्त असेल तर सोन्याची मागणी वाढते व मागणी वाढल्यामुळे त्याची किंमत देखील वाढायला लागते. तसेच सोन्याची आंतरराष्ट्रीय स्पॉट किंमत भारतातील सोन्याच्या किमतींवर परिणाम करत असते. याशिवाय मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन देखील सोन्याच्या दरावर परिणाम करते.