संधी की धोक्याची घंटा ! सोन्याची किंमत तीन लाख रुपये प्रति तोळा होणार, तज्ञांनी दिली मोठी माहिती 

Published on -

Gold Rate : गेल्या काही वर्षांमध्ये भूराजकीय तणावामुळे गुंतवणुकीचा माइंडसेड चेंज झाला आहे. कमी जोखीम असणाऱ्या ठिकाणी गुंतवणूक करण्याकडे सर्वसामान्यांचा कल असल्याचे दिसून आले आहे. याचाच परिणाम म्हणून अनेक जण सोन्यात गुंतवणूक करत आहेत. अनेक देशांमधील मध्यवर्ती बँका देखील सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.

यामुळे सोन्याचे भाव सध्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. अशातच आता गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या किमती होतील तेव्हा आपण गुंतवणूक करू पाहणाऱ्यांची निराशा करणारी व आधीच सोने खरेदी करून ठेवलेल्या गुंतवणूकदारांच्या आनंदात भर घालणारी बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भविष्यात सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. भविष्यात या पिवळ्या धातूची किंमत तीन लाख रुपये प्रति तोळ्यापर्यंत पोहोचू शकते असं भाकीत वर्तवण्यात आल आहे. अर्थात सध्याचा सोन्याचा भाव आहे त्यात आणखी 150 टक्क्यांची वाढ होऊ शकते असा अंदाज आहे.

सध्या सोन्याची किंमत प्रति औंस 4000 डॉलर आहे. सोन्याचा सध्याचा हा भाव सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरचा आहे. यामुळे भविष्यात याच्या किमती कमी व्हाव्यात अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. पण सध्याच्या परिस्थितीत भविष्यातही या पिवळ्या धातूच्या किमतीत कोणतीच कपात होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

यार्देनी रिसर्चने सोन्याच्या किमतीत झालेली ही वाढ तेजीची फक्त एक सुरुवात असल्याचे म्हटले आहे. तसेच आगामी काळात या पिवळ्या धातूच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. या संस्थेने 2028 पर्यंत सोन्याची किंमत 6 हजार डॉलर्सने वाढण्याचा अंदाज दिला आहे. 

एक तोळ्यासाठी मोजावे लागणार 3 लाखं

2026 अखेर – 5000 अमेरिकन डॉलर्स प्रति औंस

2028 – 10 हजार अमेरिकन डॉलर्स प्रति औंस

3 वर्षांनी सोन्याची किंमत प्रति औंस 8 लाख 87 हजार रुपये ( दहा हजार अमेरिकन डॉलर्स) होईल. 1 औंस म्हणजेच 25 ग्रॅम सोने. अर्थात दहा ग्रॅम सोन्याची किंमत त्यावेळी 3.1 लाख रुपये होणार आहे.

नक्कीच या संस्थेचा अहवाल खरा ठरला तर ज्यांनी सोन्यात गुंतवणूक करून ठेवले आहे त्यांना जबरदस्त लाभ मिळेल. पण त्याचवेळी किंमत कमी झाल्यानंतर गुंतवणूक करू असं स्वप्न पाहणाऱ्यांना यामुळे मोठा फटकाही बसणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News