काय सांगता ! सोन्याची किंमत 1 लाख 22 हजारावरून थेट 77 हजारावर येणार ? गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा 

Published on -

Gold Rate : सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीत अनेकजण सोने आणि चांदी खरेदीच्या तयारीत आहेत. भारतात फार पूर्वीपासून सोन्यात आणि चांदीत गुंतवणूक केली जाते. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनेक जण सोने चांदी खरेदी करतात. यामुळे लक्ष्मीपूजनाच्या महूर्तावर सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ पाहायला मिळते.

यंदाही दिवाळीत सोने जीएसटी तसेच मेकिंग चार्जेस पकडून एक लाख 45 हजार रुपये प्रति तोळापर्यंत वाढेल असा अंदाज समोर आलाय. गेल्या काही महिन्यांपासून या मौल्यवान धातूंच्या किमतीत सतत वाढ होत असून गुंतवणूकदारांना येत्या काळातही हे मौल्यवान धातू असेच तेजीत राहतील अशी आशा आहे.

दरम्यान काही अभ्यासकांनी दिवाळीत सोन्याची किंमत जीएसटी व मेकिंग चार्जेस पकडून एक लाख पंचेचाळीस हजार रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तवला आहे. दुसरीकडे असेही काही तज्ञ आहेत ज्यांनी सोन्याच्या आणि चांदीच्या भाववाढीचा हा फुगा लवकरच फुटू शकतो अशी धक्कादायक भविष्यवाणी केली आहे.

खरे तर आजच्या घडीला सोन्याची किंमत एक लाख 22 हजार रुपये प्रति तोळा एवढी आहे. परंतु सोन्याची ही किंमत येत्या काळात 77 हजार 700 पर्यंत घसरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. सोन्याच्या किमतीतील सध्याची तेजी टिकाऊ नाही तर क्षणीक आहे.

यामुळे सोन्याचा भाव लवकरच 77 हजार 700 रुपये प्रति तोळ्यापर्यंत घसरू शकतो असा अंदाज आहे. PACE 360 चे सह-संस्थापक आणि मुख्य जागतिक रणनीतिकार अमित गोयल यांनी हा अंदाज दिला आहे. गोयल यांचे असे म्हणणे आहे की सोने आणि चांदीच्या सध्याच्या किमती या त्याच्या खऱ्या मूल्यापेक्षा फारच अधिक आहेत.

ते म्हणालेत की गेल्या 40 वर्षांमध्ये जेव्हा डॉलर इंडेक्स कमकुवत असूनही सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत दोनदा प्रचंड वाढ झाली आहे. पण या मौल्यवान धातूच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानंतर नेहमीच मोठी घसरण सुद्धा झाली आहे.

मागील डेटा च्या आधारावर गोयल यांनी सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत येत्या काळात घसरून होण्याची शक्यता वर्तवली आहे. 2008 मध्ये जागतिक मंदी आली होती आणि त्यावेळी सोन्याचे दर ऐतिहासिक पातळीवर गेले होते. तसेच 2011 मध्ये देखील सोन्याच्या भावात मोठी वाढ नमूद करण्यात आली होती.

पण या मोठ्या तेजीनंतर लगेचच सोन्याच्या किमती 45 टक्क्यांपर्यंत कमी झाल्या होत्या. दरम्यान मागे दोन वेळा ज्याप्रमाणे सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत विक्रमी वाढीनंतर घसरण झाली आहे तशीच घसरण पुन्हा एकदा झाली तर सोन्याची किंमत येत्या काळात एक लाख 22 हजाराहून थेट 77 हजार रुपयांपर्यंत घसरू शकते.

चांदीच्या किमतीतही गोयल यांनी 50 टक्क्यांपर्यंत घसरण होण्याचा अंदाज दिला आहे. चांदीची किंमत सध्या प्रति किलो एक लाख 54 हजार 900 रुपये आहे. पण याची किंमत सुद्धा 77 हजार 450 रुपयांपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे. गोयल यांच्यामध्ये सध्या सोन्या आणि चांदी मधील तेजी ही मानसिक मर्यादेच्या फार जवळ पोहोचली आहे.

यामुळे येत्या काळात विक्रीचा जोर वाढणार आहे. साहजिकच विक्री वाढली की याच्या किमती कमी होणार आहेत. तसेच येत्या काळात जागतिक मंदीचा ही धोका त्यांनी वर्तवला आहे. जागतिक मंदी आल्यास औद्योगिक क्षेत्रात जो चांदीचा वापर होतो तो मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यामुळे चांदीच्या किमती कमी होतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News