Gold Rates Today : सध्या देशात लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. लग्न म्हटले की दागदागिने आलेच. अशा वेळी तुम्हालाही आज सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
कारण शुक्रवारी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत बदल झाला आहे. आज दहा ग्रॅम सोने 60,080 रुपयांवर स्वस्त झाले आहे. एक किलो चांदीचे दर वाढले असून आता ते 72,500 रुपयांना विकले जात आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.

शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 160 रुपयांनी घसरून 60,080 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 60,240 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
आज चांदी किती रुपयांवर पोहोचली आहे?
मात्र, चांदीचा भाव 360 रुपयांनी वाढून 72,500 रुपये किलो झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) सौमिल गांधी म्हणाले, “दिल्ली सराफा बाजारात स्पॉट सोन्याच्या किमती 160 रुपयांनी घसरून 60,080 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आल्या आहेत.”
परदेशी बाजारात सोन्याची घसरण
परदेशी बाजारात सोन्याचा भाव 1,953 डॉलर प्रति औंस झाला, तर चांदी 23.10 डॉलर प्रति औंस झाली.
मिस्ड कॉलद्वारे सोन्याचे दर जाणून घ्या
हे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या नंबरवर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीनतम दर पाहू शकता.
जानेवारी-मार्चमध्ये भारतातील सोन्याची मागणी 17 टक्क्यांनी घटली आहे
या वर्षी जानेवारी-मार्चमध्ये भारतातील सोन्याची मागणी 17 टक्क्यांनी घटली आहे. या काळात सोन्याची मागणी 17 टक्क्यांनी घटून 112.5 टन झाली आहे. जानेवारी-मार्चमध्ये सराफा आयात 134 टनांवर कायम राहिली.
जागतिक सुवर्ण परिषदेच्या म्हणण्यानुसार, जानेवारी-मार्चमध्ये सोन्याची जागतिक मागणी 13 टक्क्यांनी कमी झाली आहे. या काळात जागतिक सोन्याची मागणी 13 टक्क्यांनी घटून 1081 टनांवर आली आहे.