चांदीच्या किमती वाढणार, पण सोन काय करणार? वाचा आर्थिक पाहणी अहवालातली धक्कादायक शक्यता

आर्थिक पाहणी अहवालानुसार सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर घसरण होण्याची शक्यता आहे. यामध्ये महागाईत घट होण्याची अपेक्षा आहे.ज्यामुळे सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात. दुसरीकडे औद्योगिक मागणी वाढल्यामुळे चांदीच्या किमती वाढू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Published on -

Gold-Silver Rate:- आर्थिक पाहणी अहवालानुसार सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर घसरण होण्याची शक्यता आहे. यामध्ये महागाईत घट होण्याची अपेक्षा आहे.ज्यामुळे सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात. दुसरीकडे औद्योगिक मागणी वाढल्यामुळे चांदीच्या किमती वाढू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जागतिक बँकेच्या ऑक्टोबर महिन्यात प्रकाशित झालेल्या कमोडिटी मार्केट्स आउटलुकच्या आधारावर २०२५ मध्ये कमोडिटीच्या किमती ५ टक्क्यांनी आणि २०२६ मध्ये २ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे भारताच्या आयात केलेल्या वस्तूंच्या किमतींमध्ये घसरण होण्यामुळे देशांतर्गत चलनवाढीचा प्रभाव कमी होईल असे अहवालात म्हटले आहे.

काय आहे आर्थिक पाहणी अहवालात?

आर्थिक पाहणी अहवालानुसार मार्च तिमाहीत महागाईत घट होण्याची शक्यता आहे.ज्यामुळे सोन्याच्या किमतींना दिलासा मिळेल. तथापि भू-राजकीय तणाव हे एक मोठे अडथळे ठरू शकतात. ज्यामुळे निधी प्रवाहात व्यत्यय येऊ शकतो.

कामा ज्वेलरीचे एमडी कॉलिन शाह यांच्या मते, व्यापाराची भविष्यवाणी मुख्यत्वे भू-राजकीय तणाव, व्यापार शुल्क आणि डॉलर निर्देशांक यावर अवलंबून असेल. सोन्याच्या किमती अनिश्चितता आणि कमी व्याज दरांमुळे अधिक स्थिर राहण्याची शक्यता आहे.

सोन्याचे आयातशुल्क व परिणाम

सोन्याच्या किमतींबद्दल सराफा उद्योगाला काही आशा आहेत. अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क सध्याच्या ६ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कमी केले जाईल अशी आशा उद्योग प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे भारतातील प्रमुख सचिन जैन म्हणाले की, “सोने उद्योग भारताच्या जीडीपीमध्ये १.३ टक्के योगदान देतो आणि २०-३० दशलक्ष लोकांना रोजगार प्रदान करतो.

आयात शुल्क कमी केल्याने सोन्याच्या बाजारपेठेतील पारदर्शकता आणि संघटन अधिक मजबूत झाली आहे. परंतु आयात शुल्कात वाढ होईल तर तस्करी वाढण्याची शक्यता आहे आणि देशांतर्गत किमती वाढून उद्योगावर प्रतिकूल परिणाम होईल.”

भारताच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था २०२५-२६ या आर्थिक वर्षात ६.३ टक्के ते ६.८ टक्के दराने वाढू शकते. यामध्ये मजबूत देशांतर्गत मूलभूत घटक, वित्तीय सुदृढता आणि खासगी गुंतवणूक याचा प्रभाव असल्याचे सांगितले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News