१ फेब्रुवारी २०२५ मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या २०२४-२५ च्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये या वर्षात सोन्याच्या किमती कमी होण्याची, तर चांदीच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या वस्तूंच्या किमती २०२५ मध्ये ५.१ टक्के आणि २०२६ मध्ये १.७ टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे.
मौल्यवान धातूपैकी सोन्याच्या किमती घसरतील, तर चांदीच्या किमती वाढू शकतात. धातू आणि खनिजांच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे, ज्याचे प्रमुख कारण म्हणजे लोहखनिजासह तांब्याच्या किमतीत घसरण.त्यात म्हटले आहे की, सर्वसाधारणपणे, भारताने आयात केलेल्या वस्तूंच्या किमतीतील घसरणीचा कल देशांतर्गत चलनवाढीच्या दृष्टिकोनासाठी सकारात्मक आहे.
ही अंदाजित घट तेलाच्या किमतीमुळे आहे. मौल्यवान धातूंमध्ये सोन्याचे दर कमी होतील, तर चांदीच्या किमती वाढू शकतात. धातू आणि खनिजांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. जागतिक अनिश्चिततेच्या वाढीमुळे परकीय चलनाच्या साठ्यात चढ-उतार झाले आहेत.