Gold Silver Price Today : सोने-चांदी खरेदीची सुवर्णसंधी ! दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर…

Content Team
Published:
Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : जर तुमच्या घरात काही कार्यक्रम असतील आणि तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी 26 फेब्रुवारीची नवीन किंमत जाणून घ्या. आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज सोमवारी सोन्याचा भाव 160 रुपयांनी तर चांदीचा भाव 400 रुपयांनी कमी झाला आहे.

नवीन किमतींनुसार आज सोन्याचा भाव 62000/- आणि चांदीचा भाव 74000/- च्या वर गेला आहे. जाणून घेऊया 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या नवीन किंमती बद्दल….

सराफा बाजाराने सोमवारी जाहीर केलेल्या सोन्या-चांदीच्या नवीन किमतींनुसार, आज 26 फेब्रुवारी रोजी, 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,750/- रुपये, 24 कॅरेटचा भाव 62,940/- रुपयांवर ट्रेंड करत आहे आणि 18 ग्रॅम 47,250/- रुपयांवर ट्रेंड करत आहे. तर 1 किलो चांदीची किंमत 74500/- रुपये आहे.

मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत

आज सोमवारी 22 कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा आजचा भाव 57,750/- रुपये तर मुंबई सराफा बाजारात 57,600/- वर ट्रेंड करत आहे. तर पुण्यात 57,700/- रुपये असा आहे.

मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत

सोमवारी 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63, 940/- रुपये आहे तर मुंबई सराफा बाजारात किंमत 62,840/- आणि पुणे सराफा बाजारात किंमत 63,820 /- वर ट्रेंडिंग आहे.

जाणून घ्या 1 किलो चांदीची नवीन किंमत

आज सोमवारी, मुंबई दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किंमतीबद्दल बोललो तर, 01 किलो चांदीची किंमत 74,500/- आहे, तर पुणे सराफ बाजारात किंमत 74900/- रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe