Axis Bank FD : अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; जाणून घ्या FD वरील व्याजदरात किती झाली वाढ?

Axis Bank FD

Axis Bank FD : जिथे काही बँकांनी आपल्या FD व्याजदरात कपात केली आहे, तिथेच, Axis बँकेकडून मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ झाल्याची बातमी आहे. बँकेने FD व्याजदर 15 bps ने वाढवले ​​आहेत म्हणजेच Axis Bank कडून 0.15 टक्के वाढ करण्यात आली आहे. बँकेने ही वाढ 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी केली आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, हे नवे व्याजदर 11 ऑगस्टपासून लागू झाले आहेत.

बँकेने 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदर 3.5 टक्क्यांवरून 7.20 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. जर तुम्ही ऑनलाइन FD करत असाल तर तुम्ही किमान 5000 रुपयांची FD करू शकता. दुसरीकडे, जर तुम्हाला शाखेत जाऊन एफडी करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला किमान 10,000 रुपयांची एफडी करावी लागेल.

यावेळी बँकेने एफडीच्या व्याजदरात वाढ केली असली तरीदेखील, महिनाभरापूर्वी एफडीच्या दरात काहीशी कपात करण्यात आली होती. Axis बँकेने 17 जुलै 2023 रोजी व्याजदरात 10 बेस पॉइंट्स म्हणजेच सुमारे 0.10 टक्के कपात केली होती. ही वजावट 16 महिने ते 17 महिन्यांच्या FD साठी करण्यात आली होती. या कपातीनंतर एफडीवरील व्याजदर 7.20 टक्क्यांवरून 7.10 टक्के करण्यात आला.

सध्याचे Axis बँकेचे एफडी दर

– Axis बँक सध्या 7  ते 45 दिवसांच्या एफडीसाठी 3.5 टक्के व्याजदर देत आहे.
-46 ते 60 दिवसांची FD केली तर तुम्हाला 4 टक्के व्याज मिळेल.
-61 दिवसांपासून ते तीन महिन्यांच्या FD वर, तुम्हाला Axis बँकेच्या वतीने 4.5 टक्के व्याज दिले जात आहे.
-तुम्ही 3 महिन्यांपासून 6 महिन्यांपर्यंत FD घेतल्यास तुम्हाला 4.75 टक्के व्याज मिळेल.
-6 महिने ते 9 महिन्यांच्या FD वर 5.75 टक्के व्याज दिले जात आहे.
-9 महिने ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 6 टक्के व्याज दिले जात आहे.
-तुम्हाला 1 वर्ष ते 1 वर्ष 4 दिवसांच्या FD वर 6.75 टक्के व्याज दिले जात आहे.
-1 वर्ष 5 दिवसांपासून ते 13 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.80 टक्के व्याज मिळत आहे.
-बँक 13 महिने ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.10 टक्के व्याज देत आहे.
-2 वर्षे ते 30 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.05 टक्के ते 7.20 टक्के व्याज मिळत आहे.
-याशिवाय उर्वरित सर्व कालावधीसाठी 7 टक्के व्याज दिले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe