सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, ५५ हजारांवर येणार सोने?

गेल्या तीन दिवसांत सोने २,७०० रुपयांनी स्वस्त झाले असून, यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तीन महिन्यांत १७ हजारांची विक्रमी वाढ झाली होती. जागतिक घडामोडींमुळे दरात उलथापालथ होत असून घट होण्याची शक्यता आहे.

Published on -

गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या दरवाढीने विक्रमी गती पकडली आहे. जानेवारी ते मार्च २०२५ या अवघ्या तीन महिन्यांत २४ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल १७,२४८ रुपयांची घसघशीत वाढ झाली. या दरवाढीचा वेग जवळपास २० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, जो मागील अनेक वर्षांच्या तुलनेत खूपच जास्त आहे.

जागतिक घडामोडींचा परिणाम

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफ्समुळे जागतिक व्यापारावर परिणाम झाला. यामुळे शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आणि गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळण्यास सुरुवात केली. त्याचाच परिणाम म्हणजे सोने दरात झपाट्याने वाढ झाली. मात्र, या घडामोडींमुळे आता मागील तीन दिवसांत दरात २,७०० रुपयांची घट झाली आहे.

तीन महिन्यातच वाढल्या किंमती

२०२१ ते २०२३ या काळात सोन्याच्या किमतीत सरासरी वार्षिक वाढ सात ते आठ हजार रुपये इतकी होती. मात्र २०२४ मध्येच दर वाढ १३,६६३ रुपयांपर्यंत पोहोचली. डिसेंबर २०२३ मध्ये सोन्याचा दर ६३,१८७ रुपये होता, जो डिसेंबर २०२४ मध्ये ७६,८५० रुपयांवर पोहोचला. यानंतर २०२५ मध्ये अवघ्या तीन महिन्यांतच ९३,४१० रुपयांचा टप्पा पार झाला.

ग्राहकांना दिलासा

सोन्याचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे सामान्य ग्राहकांसाठी खरेदी कठीण झाली होती. अशातच गेल्या तीन दिवसांत २,७२० रुपयांची घट झाल्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोने खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी हे योग्य संधीचं वेळ ठरू शकते.

सोने ५५ हजारांवर येणार

अमेरिकेतील एका वित्तीय संस्थेनुसार, येत्या काळात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होऊन त्या थेट ५५ हजार रुपयांवर येण्याची शक्यता आहे. ही घसरण सुमारे ३८ टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. यामागे जागतिक व्यापारातली अनिश्चितता आणि अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.

गुंतवणूकदारांना चिंता

सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्यामुळे दरात मोठी घसरण झाल्यास गुंतवणूकदारांच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो. दर स्थिर राहतील की आणखी घसरतील, यावर गुंतवणूकदारांनी सतत लक्ष ठेवावे लागणार आहे. अशा परिस्थितीत सतर्कता आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe