घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! लोखंडी सळ्या ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त, आता घर बांधणेही होणार स्वस्तात मस्त

Published on -

Home Building Material Rate : आपल्यापैकी अनेकांचे घर बांधण्याचे स्वप्न असेल. माझ्याप्रमाणे कदाचित तुम्हीही या स्वप्नांसाठी आजही झगडत असाल. दरम्यान आपल्यासारख्या सर्वच घर बांधू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कारण की, आता घर बांधणे आणखी स्वस्त होणार आहे.

खरेतर गेल्या काही वर्षांमध्ये घराच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत. बिल्डिंग मटेरियलचे वाढलेले दर हे यामागील एक मुख्य कारण आहे. शिवाय इतरही अन्य कारणे यासाठी कारणीभूत आहेत. बिल्डिंग मटेरियलचे वाढलेले दर हे एक महत्त्वाचे कारण आहे यात शंकाच नाही.

पण आता घर बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या लोखंडी सळ्याच्या किमती कमी झाल्या आहेत. खरे तर घर बांधण्यासाठी वाळू, विटा आणि लोखंडी सळ्या हे तीन घटक खूपच महत्त्वाचे आहेत. याव्यतिरिक्त इतरही घटकांची घर बांधण्यासाठी आवश्यकता असते मात्र हे तीन घटक अधिक प्रमाणात लागतात आणि याशिवाय घरांचे बांधकाम जवळपास अशक्य आहे.

लोखंडी सळ्याच्या किमती कमी झाल्या असल्याने आता सर्वसामान्यांना स्वस्तात घर बांधता येईल असा आशावाद व्यक्त होत आहे. परिणामी घर बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या लोखंडावर केला जाणारा हजारो रुपयांचा खर्च कमी होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या चालू डिसेंबर महिन्यात सळ्यांची किंमत देशभरात दोन ते तीन हजार रुपयांनी कमी झाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार कानपूर मध्ये नोव्हेंबर महिन्याच्या अगदी सुरुवातीला 47 हजार रुपये प्रति टन या दरात लोखंडी सळ्या बाजारात उपलब्ध होत होत्या. मात्र गेल्या तीन दिवसांपूर्वी अर्थातच 22 डिसेंबर 2023 रोजी याच शहरात लोखंडी सळ्यांची किंमत 45 हजार 700 रुपये प्रति टन एवढी नमूद करण्यात आली आहे.

दुसरीकडे रायपूर मध्ये लोखंडी सळ्यांची किंमत 43 हजार रुपयांवर आली आहे. आपल्या महाराष्ट्रात मात्र या शहराच्या तुलनेत आजही लोखंडी सळ्या महागच मिळत आहेत. राज्यातील जालना या शहरात जुलैमध्ये लोखंडी सळ्यांची किंमत 51 हजार दोनशे रुपये प्रति टन एवढी नमूद करण्यात आली होती मात्र आता याच शहरात लोखंडी सळ्यांची किंमत 48 हजार दोनशे रुपये प्रति टन एवढी आहे.

अर्थातच किमतीमध्ये जवळपास तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे. घर बांधणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी राहणार असून यामुळे बिल्डिंग मटेरियलसाठी केला जाणारा हजारो रुपयांचा खर्च कमी होणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना स्वस्तात आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करता येईल अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe