LIC धारकांसाठी खुशखबर ! आता ‘अशा’ पद्धतीने केवळ एका क्लिकवर UPI द्वारे भरा प्रीमियम

LIC

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC बददल आज सर्वानाच माहिती आहे. गुंतवणुकीचा चांगला मार्ग, एकदम सेक्युअर रिटर्न देणारा ऑप्शन म्हणून एलआयसीकडे पाहिले जाते. LIC कडे अतिशय उत्तम अशा पॉलिसी आहेत. लहान मुलांसापसुन तर वृद्धांपर्यंत LIC विविध प्लॅन आणते. सध्या मार्केटमध्ये अनेक गुंतवणुकीचे ऑप्शन आहेत परंतु LIC कडे एक विश्वसनीय म्हणून पाहिले जाते. दरम्यान LIC धारकांसाठी एक मोठी समस्या होती.

ती म्हणजे प्रीमियम भरणे. दर महिन्याला एलआयसी प्रीमियम भरण्यासाठी ऑफिसला जावे लागे. किंवा एलआयसी एजंटकडे पैसे द्यावे लागे, मग त्यातही एजंटकडून गफला होण्याचे प्रकार काही ठिकाणी झाले होते. परंतु आता प्रीमियम भरणे खूप सोपे झाले आहे. तुम्ही आता काही क्लिकमध्ये LIC प्रीमियम भरू शकता. आता तुम्ही UPI द्वारे पेमेंट करू शकता. चला जाणून घेऊयात.

UPI द्वारे प्रीमियम

यापूर्वी, केवळ ऑनलाइन बँकिंग आणि डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वापरून ऑनलाइन प्रीमियम भरता येत होता. परंतु एलआयसीने आपल्या सेवांचा विस्तार करत नवीन सुविधा आणली आहे. आता LIC ने पेटीएम, गुगल पे सारख्या UPI प्लॅटफॉर्मचा पर्याय देखील समाविष्ट केला आहे. आज येथे आपण LIC पॉलिसी UPI शी लिंक करण्याची आणि UPI द्वारे प्रीमियम भरण्याची प्रक्रिया सांगणार आहोत..

तुमची पॉलिसी अशा पद्धतीने करा पेटीएमला लिंक

तुमची LIC पॉलिसी पेटीएमशी लिंक करायची असेल तर – तुम्हाला पेटीएम अॅपवर जा, रिचार्ज आणि बिल पेमेंट ऑप्शन घ्या. त्यात तुम्हाला जे काही ऑप्शन दिसतील त्यात View More वर क्लिक करा. तुम्हाला येथे LIC चा आता ऑप्शन मिळणार आहे. तुम्हाला यावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला इंश्योरेंस प्रीमियम असे दिसेल. त्यावर क्लिक करताच विविध माहिती भरा.

अशा पद्धतीने तुमची पॉलिसी पेटीएमशी लिंक होईल. यानंतर तुम्ही पेटीएमद्वारे प्रीमियम भरू शकता. पेमेंट करण्यासाठी तुम्हाला UPI पिन टाकावा लागेल. त्यानंतर प्रीमियमची रक्कम तुमच्या खात्यातून डेबिट केली जाईल. अशा पद्धतीने तुम्ही पॉलिसीचा प्रिमिअम भरू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe