आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या आठवड्यात 3 कंपन्यांचे आयपीओ येणार , पहा डिटेल्स

Published on -

IPO News : गेल्या वर्षी शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना निराश केले. मागील वर्षी अनेक कंपन्यांच्या शेअर्समधून गुंतवणूकदारांना निगेटिव्ह रिटर्न मिळालेत. मात्र हे वर्ष शहर बाजारासाठी निर्णायक ठरू शकते आणि यावर्षी गुंतवणूकदारांना मार्केटमधून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. किंबहुना शेअर मार्केटची नव्या वर्षाची सुरुवात चांगलीच आश्वासक झाली आहे आणि यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय.

दरम्यान हा आठवडा शेअर मार्केटच्या दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा ठरणार आहे कारण की या आठवड्यात पाच कंपन्यांचे आयपीओ खुले होणार आहेत. महत्त्वाची बाब अशी की यातील बहुतांशी आयपीओला ग्रे मार्केटमध्ये चांगला जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आहे. आता ग्रे मार्केटमध्ये चांगली जबरदस्त सुरुवात झाली असल्याने गुंतवणूकदारांमध्ये देखील या आठवड्यात दाखल होणाऱ्या आयपीओबाबत कमालीचा उत्साह दिसून येतोय. दरम्यान आज आपण या आठवड्यात कोणत्या पाच कंपन्यांचे आयपीओ धडकणार आहेत आणि त्या आयपीओचा प्राथमिक तपशील काय आहे याची माहिती येथे घेणार आहोत.

गॅबियन टेक्नॉलॉजीज : हा आयपीओ आज पासूनच सबस्क्रीप्शन साठी खुला होत आहे. सहा ते आठ जानेवारी 2026 दरम्यान हा आयपीओ खुला राहणार आहे. दरम्यान ग्रे मार्केटमध्ये या ipo ला जबरदस्त रिस्पॉन्स मिळत असून सध्या या शेअर साठी ग्रे मार्केटमध्ये तीस रुपयाचा प्रीमियम मिळत आहे. यामुळे लिस्टिंग मधून गुंतवणूकदारांना 37% पर्यंत चा नफा मिळू शकतो. हा स्टॉक 13 जानेवारी रोजी लिस्ट होणार अशी माहिती हाती आली आहे. या स्टॉकची फेस व्हॅल्यू 10 रुपये प्रति शेअर अशी आहे. या शेअरची प्राईस रेंज 76 ते 81 रुपये एवढी असून एका लॉटमध्ये 1600 शेअर्स आहेत.

व्हिक्टरी इलेक्ट्रिक व्हेइकल्स : इलेक्ट्रिक थ्री व्हीलर व संबंधित उत्पादनांच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कार्यरत या कंपनीचा आयपीओ 7 जानेवारी रोजी खुला होणार आहे आणि 9 जानेवारीपर्यंत ओपन राहील. ग्रे मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील या कंपनीची सुरुवात शांत राहिली आहे. मात्र तरीही इलेक्ट्रिक वाहनांसाठी चांगली मागणी असल्याने गुंतवणूकदारांचे याकडे लक्ष आहे. दरम्यान या कंपनीचे शेअर्स 14 जानेवारी रोजी लिस्ट होणार आहेत. या शेअरचे फेस व्हॅल्यू पाच रुपये प्रति शेअर असे आहे. प्राइस रेंज 41 रुपये आहे. मात्र लॉट साईज 3000 शेअर्सची आहे.

भारत कोकिंग कोल आयपीओ : हा या आठवड्यातील सर्वाधिक मोठा आयपीओ आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ग्रे मार्केटमध्ये सुद्धा याला चांगला प्रतिसाद मिळतोय. ग्रे मार्केटमध्ये या शेअर साठी 16 ते 17 रुपये प्रीमियम सुरू आहे. ही कोल इंडियाची उपकंपनी आहे अन् म्हणूनच या कंपनीकडे गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष आहे. दरम्यान हा ipo 9 जानेवारी रोजी खुला होणार असून 13 जानेवारी पर्यंत सबस्क्रीप्शन साठी खुला राहील. या शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये प्रति शेअर आहे. प्राइस रेंज 21 ते 23 रुपयांच्या दरम्यान असून यासाठीची लॉट साईझ 600 शेअर्स प्रति लॉट अशी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News