Goods Price:- आपल्याला माहित आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकतीच जीएसटी दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आला व यामध्ये आता चार ऐवजी दोनच कर स्लॅब ठेवण्यात आले व त्यामुळे आता अनेक दैनंदिन वापराच्या वस्तू मोठ्या प्रमाणावर स्वस्त होण्यास मदत झालेली आहे. इतकेच नाही तर टाटा तसेच महिंद्रा सारख्या कंपन्यांची वाहने देखील स्वस्त झालेली आहे. सणासुदीच्या मुहूर्तावर करण्यात आलेल्या या बदलामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाच्या अशा मोठ्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती मोठ्या प्रमाणावर कमी करण्याच्या घोषणा केल्या असून त्यामुळे आता गृहिणीचे घरगुती बजेटला खूप मोठा दिलासा मिळणार आहे. यामध्ये आघाडीचे असलेल्या पार्ले प्रॉडक्ट, कोलगेट- पामोलिव्ह, ब्रिटानिया तसे हिंदुस्तान युनिलिव्हर, वोल्टास, एलजी आणि आयटीसी सारख्या आघाडीच्या कंपन्यांनी दर कपातीचे संकेत दिले आहेत. तसेच या कंपन्यांच्या प्रमुखांनी स्पष्टीकरण दिले आहे की या दर कपातीचा फायदा थेट ग्राहकांपर्यंत पोहचवला जाणार आहे. जीएसटी दर कपातीमुळे आता रोजच्या वापराच्या वस्तू स्वस्त होणार आहेत व त्यामुळे ग्राहकांची खरेदीची क्षमता वाढणार आहे. इतकेच नाही तर दैनंदिन वापराच्या वस्तूंसोबत इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात देखील विक्रीत वाढ होणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
कोणत्या क्षेत्रात होतील दर कमी?
जीएसटी दर कपातीचा सर्वाधिक परिणाम हा अन्नपदार्थ, स्नॅक्स आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंवर दिसून येणार आहे. लोणी तसेच चीज, स्नॅक्सवरील कर आता बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलेला आहे. त्यासोबतच चॉकलेट्स, बिस्किट, कॉर्न फ्लेक्स, कॉफी, आईस्क्रीम, केसांचे तेल, शाम्पू, साबण तसेच शेविंग क्रीम आणि टूथपेस्ट यावर देखील आता पाच टक्के जीएसटी आकारला जाणार असल्याने या वस्तू देखील आता स्वस्त होण्यास मदत होणार आहे.

टाटा आणि महिंद्राची वाहने झाली स्वस्त
या जीएसटी कपातीचा लाभ हा वाहने खरेदी करणाऱ्यांना देखील होणार आहे. जीएसटी कपातीच्या पार्श्वभूमीवर महिंद्रा अँड महिंद्राने देखील प्रवासी वाहन श्रेणीतील दरांमध्ये साधारणपणे एक लाख 56 हजार पर्यंत दरकपात करण्याची घोषणा केली आहे व या नवीन किमती 6 सप्टेंबर पासून लागू केल्या गेल्या आहेत. त्यासोबतच टाटा मोटर्सने देखील किमती कमी करण्याची घोषणा केली असून प्रवासी वाहनांवर एक लाख 55 हजार रुपयांपर्यंत दर कपात केली आहे व 22 सप्टेंबर पासून या नवी किमती लागू होणार आहेत.
श्राद्धाच्या दिवसात भाजीपाला कडाडला
दुसरे महत्त्वाचे म्हणजे सध्या पितृपक्ष म्हणजे श्राद्धाच्या दिवसांना सुरुवात झालेली आहे व पुढील पंधरा दिवसांपर्यंत पितृपक्ष असतो. यामुळे आता अनेक भाजीपालांच्या दरांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेवग्याचे दर 120 रुपये किलो, गवार दोनशे रुपये किलो, अळूच्या दहा पानांची गड्डी वीस रुपयाला सध्या मिळत आहे. टोमॅटोच्या दरात देखील वाढ झाली असून सध्या पन्नास रुपये किलो दर आहे. मेथी आणि कोथिंबिरीची जुडी बघितली तर अनुक्रमे 50 रुपये व 40 रुपये दराने विकली जात आहे.कारण पितृपक्षाच्या दिवसांमध्ये या दोन्ही भाज्यांना देखील चांगली मागणी असते. कडधान्यांमध्ये मात्र चणादाळ व उडीदडाळीचे दर मात्र स्थिर आहेत. सध्या चणाडाळ 90 तर उडीद डाळ 120 रुपये किलो दराने मिळत आहे