Government Scheme:- समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक मदत करण्यात येते व या माध्यमातून व्यवसायाची उभारणी किंवा आहे त्या व्यवसायाचा विस्तार करणे शक्य होते. अशा अनेक प्रकारच्या योजना आपल्याला सांगता येतील. यामध्ये जर आपण केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री स्वनिधी योजना बघितली तर ही अतिशय फायद्याची अशी एक योजना असून या माध्यमातून छोट्या विक्रेत्यांना कुठल्याही तारणाशिवाय कर्ज दिले जाते. अगोदर या योजनेतून जे कर्ज मिळत होते त्यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे व मुदत देखील वाढवण्यात आलेली आहे. चला तर मग याच योजनेची माहिती या लेखात बघू.
पीएम स्वनिधी योजनेतून मिळेल 90 हजाराचे कर्ज
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली पीएम स्वनीधी योजनेची कर्जाची मर्यादा 80 हजार रुपयावरून आता 90 हजार रुपये करण्यात आलेली आहे व या योजनेची मुदत 2030 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ हा देशातील लाखो विक्रेत्यांना झाला असून या योजनेतून लाभार्थ्यांना तीन टप्प्यांमध्ये कर्ज दिले जाते. यात पहिल्या टप्प्यात 15000, दुसरा टप्प्यात 25 आणि तिसऱ्या टप्प्यात पन्नास हजार रुपयाचे कर्ज दिले जाते. कर्जामुळे अनेक व्यावसायिकांना त्यांचे छोटेसे व्यवसाय उभे करण्यास मोठी मदत मिळणार आहे. यात काही ठराविक वेळेत हप्ते भरल्यानंतरच पुढच्या टप्प्याचे कर्ज उपलब्ध होते.

या योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये
या योजनेत कुठल्याही प्रकारचे तारण किंवा हमी कर्जदाराला दयावे लागत नाही. अगदी आधार कार्ड दाखवून या माध्यमातून कर्ज मिळवता येऊ शकते. तुम्ही जे काही कर्ज घेतात ते एका वर्षात परतफेड करावे लागते. ईएमआय स्वरूपामध्ये तुम्हाला या कर्जाची परतफेड करता येते. तसेच महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जे लाभार्थी वेळेमध्ये कर्ज फेडतात त्यांना यूपीआय लिंक्ड रुपे क्रेडिट कार्ड दिले जाते. तसेच डिजिटल पेमेंट प्रोत्साहन करिता 1600 रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील दिला जाणार आहे.