PM Youth Empowerment Scheme : भारताकडे एक ‘तरुण देश’ म्हणून पाहिले जाते. भारतातील 50% लोकसंख्या 16 ते 40 वयोगटातील आहे. तरुण हा भारताचा कणा आहे आणि विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. या तरुणांवरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे. अशातच तरुणांसाठी सरकारने एक खास योजना सुरु केली आहे.
जर तुम्हाला सध्या व्यवसाय सुरू करून तुमच्या देशासाठी योगदान द्यायचे असेल आणि स्वत:ला सुधारायचे असेल, तर सरकार तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही तारण न घेता देत आहे.
आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत ती म्हणजे पंतप्रधान मुद्रा योजना, भारतातील तरुण पंतप्रधान मुद्रा योजनेचा वापर करून त्यांचा व्यवसाय सहज सुरू करू शकतात. मोदी सरकारने ही योजना २०१५ मध्ये ही योजना सुरू केली होती. ज्या अंतर्गत तरुण त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतील.
या प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत तुम्हाला बिगर कृषी काम आणि बिगर कॉर्पोरेट कामासाठी कर्ज दिले जाते. तुम्ही या योजनेअंतर्गत सरकारकडून 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. सामान्यतः, जर तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी कर्जाची आवश्यकता असेल, तर तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी सुरक्षा म्हणून काहीतरी गहाण ठेवावे लागेल. परंतु प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत दिलेल्या या कर्जावर तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची तारण अर्थात सुरक्षा मागितली जात नाही.
जर तुम्हाला या योजनेद्वारे कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला तीन श्रेणींमध्ये कर्ज मिळते. पहिली श्रेणी म्हणजे शिशू कर्ज ज्यामध्ये 50,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. जर तुम्हाला थोडे जास्त पैसे हवे असतील तर तुम्ही किशोर लोन घेऊ शकता, ज्याद्वारे तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. जर तुमचा व्यवसाय सुरवातीपासून सुरू होत असेल तर तुम्ही तरुण कर्जाद्वारे 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम घेऊ शकता.
हे कर्ज घेण्यासाठी, सर्वप्रथम तुमचे वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे आणि तुम्ही भारतीय नागरिक देखील असणे आवश्यक आहे. याशिवाय, तुमच्याकडे बँक डिफॉल्टचा कोणताही पूर्वीचा इतिहास नसावा. यासाठी तुमचे बँक खाते देखील असले पाहिजे.