Groww Share Price : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक महत्वाचे अपडेट समोर येत आहे. खरेतर सध्या देशांतर्गत शेअर्समध्ये तुफान खरेदी केली जात आहे. दरम्यान या खरेदीच्या वातावरणात आज आघाडीच्या स्टॉकब्रोकिंग प्लॅटफॉर्म ग्रोची मूळ कंपनी असलेल्या बिलियनब्रेन्स गॅरेज व्हेंचर्सच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली.
ग्रोच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ होत असल्याने याच्या आयपीओ गुंतवणूकदारांना फक्त चार दिवसातच मोठा नफा मिळवला आहे. मागील चार दिवसांत या शेअर्सने 78% पेक्षा जास्त रिटर्न दिले आहेत.

हा शेअर्स ज्या किंमतीत लिस्ट झाला त्यापेक्षा आतापर्यंत 59% वाढला आहे. दरम्यान या तेजीचा काही गुंतवणूकदारांना चांगला लाभ झाला आहे. पण या तेजीचा अनेकांनी फायदा घ्यायचा म्हणून नफा वसुली सुद्धा केली.
नफा वसुलीसाठी काही गुंतवणूकदारांनी शेअर्सची विक्री केली. याचा परिणाम म्हणून किमतींमध्ये थोडीशी घसरण झाली. मात्र आजही स्टॉक मजबूत स्थितीत आहे. आज हा स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 17.76 टक्क्यांनी वाढला.
आज याची किंमत 174.77 रुपये एवढी राहिली. विशेष म्हणजे दिवसाच्या शेवटी हा स्टॉक 20 टक्क्यांनी वाढून 178.09 रुपयांवर बंद झाला. त्याचे 100 रुपयांचे शेअर्स बीएसई अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 114 रुपये आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर 112 रुपयांना लिस्ट झाले होते.
3 नोव्हेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांकडून ग्रोने 2984 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली. ग्रोचा 6622.30 कोटी रुपयांचा आयपीओ 4 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. दरम्यान या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आणि एकूण 17.60 पट सबस्क्राइब झाला.
यासाठीची इश्यू प्राइस बँड 95 ते 100 रुपये असा निश्चित करण्यात आला. पीक एक्सव्ही, टायगर कॅपिटल आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांसारख्या प्रमुख गुंतवणूकदारांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे.
दरम्यान ग्रो आयपीओच्या रकमेचा वापर तंत्रज्ञान विकास आणि व्यवसाय विस्तारासाठी करणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की कंपनीने आयपीएस साठी मे महिन्यापासून तयारी सुरू केली होती.
ग्रोने मे महिन्यात बाजार नियामक सेबीकडे गोपनीयपणे आयपीओ मसुदा दाखल केला आणि ऑगस्टमध्ये सेबीची मान्यता मिळाली. या आयपीओमध्ये कंपनीकडून 1 हजार 60 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करण्यात आले. कंपनीचे उर्वरित शेअर्स विक्रीसाठी ऑफर विंडोद्वारे विकले गेले होते.













