GST On Gold:- सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील नागरिकांना सणासुदीच्या कालावधीमध्ये जीएसटी मध्ये बदल करून खूप मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. आपल्याला माहित आहे की अगोदर जीएसटीचे चार कर स्लॅब होते व ते आता फक्त दोनच ठेवण्यात आलेले आहेत. अगोदरचे बारा आणि 28 टक्क्यांचा जो काही स्लॅब होता तो आता रद्द करण्यात आला असून त्याऐवजी फक्त पाच आणि 18% चा स्लॅब ठेवण्यात आलेला आहे. या नवीन बदलामुळे आता दैनंदिन वापरातील ज्या काही अत्यावश्यक गरजेच्या वस्तू आहेत त्या अतिशय स्वस्त होण्यास मदत होणार आहे व या माध्यमातून नक्कीच नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पण यामध्ये बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की आता या नवीन बदलामुळे सोन्या चांदीच्या खरेदीवर जो काही जीएसटी आकारला जात होता त्याच्यात काही बदल होणार आहेत का? तर याच प्रश्नाचे उत्तर या लेखात आपण शोधणार आहोत.
सोन्या चांदीवर किती लागेल जीएसटी
सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून जीएसटीच्या एकूण रचनेमध्ये बदल करण्यात आला आहे व त्यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तू स्वस्त होण्यास मदत होणार आहे. परंतु या बदलामधून मात्र सोने आणि चांदीला वगळण्यात आलेले आहे. कारण सोन्या आणि चांदीवर अगोदर जो काही तीन टक्क्यांचा जीएसटी लागू होता तोच आता देखील लागू राहणार आहे. तसेच दागिन्यांचा मेकिंग चार्ज म्हणजे दागिने बनवण्याच्या शुल्कावर देखील पाच टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्ही जर एक लाख रुपयांचे सोने किंवा चांदीचे खरेदी करत असाल तर तुम्हाला अंदाजे तीन हजार रुपये जीएसटी यावर द्यावा लागणार आहे. परंतु जीएसटीमध्ये सुधारणा केल्याने रोजच्या वापरातील वस्तू तसेच खाद्यपदार्थ व इतर आवश्यक घरगुती साहित्य स्वस्त होणार आहे. परंतु सोने चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मात्र यातून कुठलाही दिलासा मिळालेला नाही.
