पहिल्याच दिवशी ‘हा’ IPO 19% सबस्क्राईब! गुंतवणूकदारांची मोठीच क्रेझ… ग्रे मार्केटमध्ये उसळी

Published on -

Oswal Pumps IPO:- आज शेअर बाजारात ओसवाल पंप्सच्या आयपीओने पहिल्याच दिवशी काहीसं संमिश्र चित्र दाखवलं. गुंतवणूकदारांची सुरुवातीची प्रतिक्रिया काहीशी सावध होती, मात्र ग्रे मार्केटमध्ये या शेअरच्या किंमतीत प्रीमियम दिसून आल्याने, आगामी दिवसांत यावर अधिक लक्ष केंद्रित होणार आहे.

पहिल्या दिवशी झाला 19% सबस्क्राईब

१३ जूनपासून खुला झालेला ओसवाल पंप्सचा आयपीओ पहिल्या दिवशी एकूण १९ टक्के सबस्क्राइब झाला. रिटेल गुंतवणूकदारांनी थोडीशी उत्सुकता दाखवत ०.१९ पट अर्ज केले, तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांचा सहभाग फारसा नव्हता.केवळ ०.०८ पट सबस्क्रिप्शन. मात्र, एनआयआय म्हणजेच नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांनी अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या विभागात ३४ टक्के अर्ज झाले.

या आयपीओची लॉट साईज काय?

या आयपीओचा किंमत बँड ५८४ रुपये ते ६१४ रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. किमान २४ शेअर्ससाठी अर्ज करावा लागतो, म्हणजेच एका गुंतवणुकीसाठी जवळपास १४ हजार रुपयांची रक्कम लागते.

ग्रे मार्केटमधील स्थिती काय?

ग्रे मार्केटमधील स्थिती थोडी सैरभैर दिसते. या इश्यूच्या सुरुवातीला जीएमपी (ग्रे मार्केट प्रीमियम) ८८ रुपयांवर होता, पण सध्या तो ५३ रुपयांवर घसरला आहे. याचा अर्थ असा की, बाजारात उत्साह आहे, पण तो थोडासा सावध आहे.कंपनीचा हा आयपीओ एकूण १३८७ कोटी रुपयांचा आहे, यामध्ये १.४५ कोटी नव्या शेअर्सची विक्री आणि ८१ लाख शेअर्स विक्रीसाठीच्या ऑफरअंतर्गत जारी करण्यात येणार आहेत. आयपीओपूर्वी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून तब्बल ४१६ कोटी रुपये उभारले होते.

हा मेनबोर्ड आयपीओ असून त्याची लिस्टिंग बीएसई आणि एनएसई या प्रमुख शेअर बाजारांमध्ये होणार आहे. या इश्यूच्या व्यवस्थापनासाठी आयआयएफएल, अ‍ॅक्सिस कॅपिटल, सीएलएसए इंडिया, जेएम फायनान्शियल आणि नुवामा वेल्थ मॅनेजमेंट या नामांकित बुक रनिंग लीड मॅनेजर्सची नेमणूक करण्यात आली आहे.

सध्या गुंतवणूकदार बाजारात स्थिरतेच्या आणि विश्वासाच्या संकेतांची वाट पाहत आहेत. ओसवाल पंप्ससारख्या कंपन्यांचा आयपीओ हा एक संकेत ठरू शकतो की बाजारात नव्या गुंतवणुकीसाठी हळूहळू जागा तयार होते आहे. पण अंतिम यश हे गुंतवणूकदारांचा प्रतिसाद आणि लिस्टिंगनंतरच्या हालचालींवर अवलंबून असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News