HDFC Bank vs SBI : एचडीएफसी आणि एसबीआय बँक जेष्ठ नागरिकांना करत आहेत श्रीमंत; बघा एफडीवरील व्याजदर…

Content Team
Published:
HDFC Bank vs SBI

HDFC Bank vs SBI : देशात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत परंतु आजही लोक एफडीमध्ये पैसे गुंतवण्यास महत्व देतात. ज्येष्ठांना लक्षात घेऊन बँकेने अनेक एफडी योजना आणल्या आहेत ज्या उत्तम परतावा देत आहेत. आजच्या या लेखात आपण अशाच काही योजनांबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग…

HDFC ने देशातील ज्येष्ठ नागरिकांना लक्षात घेऊन एक विशेष FD योजना आणली आहे. तसेच SBIने अशीच एक योजना लॉन्च केली आहे. या योजनेचे नाव
SBI WeCare आहे. तर HDFC बँकेने सिनियर सिटिझन केअर अशी एक योजना लॉन्च केली आहे. आज आपण या दोन्ही FD योजनांबद्दल जाणून घेणार आहोत, या योजना किती व्याजदर देत आहेत चला जाणून घेऊया…

HDFC बँकेने 60 वर्षांवरील लोकांसाठी ही खास FD योजना आणली आहे. बँक ही योजना 2020 पासून चालवत आहे. या योजनेअंतर्गत, बँक ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 0.50 टक्के व्यतिरिक्त 0.25 टक्के अतिरिक्त व्याजदर देत आहे.

बँक 5 ते 10 वर्षांच्या या FD योजनेवर 7.75 टक्के व्याज देत आहे. हे व्याज ५ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडी योजनांवर दिले जात आहे. बँकेने या योजनेतील गुंतवणुकीची अंतिम मुदत 11 मे 2024 पर्यंत वाढवली आहे.

SBI ने देखील खासकरून ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI WeCare FD योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, बँक ग्राहकांना 5 वर्षे ते 10 वर्षांपर्यंत FD योजना देत आहे. या योजनेअंतर्गत बँक वृद्धांना ५० bps म्हणजेच ०.५० टक्के अधिक व्याज देत आहे.

या सरकारी योजनेत तुम्ही ३० सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकता. बँक या विशेष एफडी योजनेअंतर्गत ५ ते १० वर्षांसाठी ७.५० टक्के व्याज देत आहे. अशा परिस्थितीत एचडीएफसी बँकेच्या विशेष एफडी योजनेवर ग्राहकांना जास्त परतावा मिळत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe