HDFC Bank : तुम्ही सध्या HDFC बँकेकडून लोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. HDFC बँकेने गृहकर्ज तसेच इतर कर्ज महाग केले असून, ग्राहकांना धक्का दिला आहे, तुम्ही येथून कर्ज घेण्याच्या विचारत असाल तर नवीन व्याजदर जाणून घेणे तुम्हाला महत्वाचे ठरेल. बँकेने जारी केलेले नवीन व्याजदर बँकेच्या वेबसाईटवर देण्यात आलेले आहेत.
खाजगी क्षेत्रातील या सर्वात मोठ्या HDFC बँकेने निवडक कालावधीसाठी गृहकर्ज आणि इतर कर्जावरील फ्लोटिंग व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने सर्व कर्जांसाठी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) 10 बेस पॉइंट्सने बदलला आहे. यामुळे आता मासिक हप्ता वाढेल. ज्यामुळे तुमच्यावर आधीपेक्षा जास्त कर्जाचा भार असेल.

MCLR म्हणजे काय?
मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) हा मूलभूत किमान दर आहे ज्याच्या आधारावर बँका ग्राहकांना कर्ज देतात. HDFC बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी MCLR 8.50 वरून 9.25 टक्के केला आहे. नवे दर प्रभावी झाले आहेत. दरम्यान, अलीकडेच आरबीआयने रेपो दर कायम ठेवला होता.
ग्राहकांवर ईएमआयचा बोजा वाढण्याची शक्यता ?
बँकांच्या या पाऊलामुळे ग्राहकांवर बोजा वाढणार आहे. गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, कार कर्ज इत्यादींचा ईएमआय वाढेल कारण या सर्वांचा थेट परिणाम MCLR वर होतो. जेव्हा बँक एखाद्या ग्राहकाला कर्ज देते तेव्हा ती MCLR दराने व्याजदर आकारते. यामध्ये काही बदल केल्यास कर्जाच्या किमतीवर म्हणजेच व्याजदरावरही परिणाम होतो.
इतर बँकांचे MCLR
तुमच्या माहितीसाठी ICICI बँक, येस बँक आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) यांनी वेगवेगळ्या मुदतीच्या कर्जावरील त्यांच्या किरकोळ खर्चावर आधारित कर्ज दर (MCLR) सुधारित केले आहेत. बँकेच्या वेबसाइटनुसार, सुधारित MCLR 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू झाले आहेत. या बँकांचे MCLR दर तपासण्यासाठी तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.