HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी ! ‘ह्या’ दोन दिवसांसाठी बंद असणार UPI आणि नेटबँकिंग

एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. भारतातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकेने 24 आणि 25 जानेवारी 2025 रोजी आपल्या काही डिजिटल आणि बँकिंग सेवांसाठी देखभाल प्रक्रिया राबवणार आहे. त्यामुळे या कालावधीत काही सेवा तात्पुरत्या बंद राहणार आहेत. बँकेने सांगितले आहे की, सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी ही आवश्यक प्रक्रिया करण्यात येत आहे.

Tejas B Shelar
Published:

HDFC Bank Alert : एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. 24 आणि 25 जानेवारी 2025 रोजी बँकेच्या काही डिजिटल आणि बँकिंग सेवा तात्पुरत्या बंद राहतील. बँकेने सांगितले आहे की, सेवेत सुधारणा करण्यासाठी ही देखभाल प्रक्रिया केली जात आहे, त्यामुळे काही काळ या सेवा उपलब्ध होणार नाहीत.

कधी आणि कोणत्या सेवांवर परिणाम होईल?

24 जानेवारी रात्री 10:00 वाजल्यापासून 25 जानेवारी सकाळी 2:00 वाजेपर्यंत (16 तास) चॅटबँकिंग, एसएमएस बँकिंग आणि फोनबँकिंग IVR सेवा बंद राहतील. याशिवाय, 25 जानेवारी रोजी सकाळी 12:00 ते पहाटे 3:00 (3 तास) दरम्यान UPI सेवा देखील बंद असेल.

UPI सेवा बंद असल्याने, HDFC बँकेच्या खात्यांवरील व्यवहार, रुपे क्रेडिट कार्ड व्यवहार, मोबाइल बँकिंग ॲप आणि थर्ड-पार्टी ॲप्सवर होणारे व्यवहारही याच कालावधीत काम करणार नाहीत. यामुळे व्यापाऱ्यांचे UPI व्यवहारही थांबणार आहेत.

ग्राहकांसाठी बँकेचा सल्ला

एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. बँकेने ईमेलद्वारे ही माहिती सर्व नोंदणीकृत ग्राहकांपर्यंत पोहोचवली आहे. ग्राहकांनी व्यवहारांची योग्य प्रकारे योजना आखून कोणताही अडथळा टाळावा, असे बँकेने आवाहन केले आहे.

सेवा सुधारण्यासाठी बँकेचा प्रयत्न

एचडीएफसी बँक आपल्या डिजिटल सेवांमध्ये सातत्याने सुधारणा करत आहे. ही देखभाल प्रक्रिया ग्राहकांना अधिक चांगल्या आणि वेगवान सेवा देण्यासाठी उपयुक्त ठरेल. तरी, 24 आणि 25 जानेवारी या दोन दिवसांत डिजिटल सेवा बंद राहणार असल्याने ग्राहकांनी आपल्या व्यवहारांबाबत योग्य नियोजन करावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe