HDFC Bank FD Scheme:- एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी आकर्षक फिक्स्ड डिपॉझिट योजना सादर करत असते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेने सीनियर सिटीजन केअर एफडी योजना सुरू केली आहे.
जी सामान्य एफडीपेक्षा अधिक व्याजदर आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय देते. जर तुम्ही तुमच्या पालकांसाठी किंवा कुटुंबातील वयोवृद्ध सदस्यांसाठी चांगल्या परताव्यासह दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही योजना उत्तम पर्याय ठरू शकते.
HDFC सीनियर सिटीजन केअर एफडीचे वैशिष्ट्ये
एचडीएफसी बँकेने २०२० मध्ये ही योजना सुरू केली आणि ती एक मर्यादित कालावधीची विशेष योजना आहे. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ०.७५% अतिरिक्त व्याजदराचा फायदा मिळतो.जो सामान्य एफडीपेक्षा अधिक आहे. ही योजना अशा गुंतवणूकदारांसाठी उत्तम आहे.जे स्थिर आणि सुरक्षित परतावा शोधत आहेत.
गुंतवणूक आणि कालावधी
एचडीएफसी बँकेच्या ज्येष्ठ नागरिक सेवा एफडीमध्ये खालील अटी लागू होतात
किमान गुंतवणूक रक्कम –5,000 रुपये आणि
कमाल गुंतवणूक मर्यादा – 5 कोटी रुपये
कालावधी
गुंतवणुकीचा कालावधी हा किमान 5 वर्षे 1 दिवस ते कमाल 10 वर्षे इतका आहे.
ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मानली जाते. कारण यात उच्च व्याजदर आणि कमी जोखीम आहे.
HDFC बँकेचे नवीन FD व्याजदर (2025)
7 ते 14 दिवस
सामान्य नागरिकांसाठी 3% ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50%
30 ते 45 दिवस
सामान्य नागरिकांसाठी 3.50% ज्येष्ठ नागरिकांसाठी 4%
90 दिवस ते 6 महिने
सामान्य नागरिकांसाठी 4.50% ज्येष्ठ नागरिकांसाठी 5%
1 वर्ष ते 15 महिने
सामान्य नागरिकांसाठी 6.60% ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.10%
2 ते 3 वर्षे
सामान्य नागरिकांसाठी 7% ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50%
5 ते 10 वर्षे
सामान्य नागरिकांसाठी 7% ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75%
विशेष लाभ
जर तुम्ही 5 वर्षांहून अधिक कालावधीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 7.75% पर्यंत व्याजदर मिळू शकतो. जो इतर अनेक एफडी योजनांपेक्षा अधिक आकर्षक आहे.
HDFC सीनियर सिटीझन केअर FD कशी उघडावी?
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
HDFC नेट बँकिंग किंवा मोबाईल अॅपमध्ये लॉगिन करा.फिक्स्ड डिपॉझिट (FD) विभागात जाऊन ‘सीनियर सिटीझन केअर FD’ निवडा.आवश्यक माहिती भरून गुंतवणुकीची रक्कम आणि कालावधी निवडा.पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा.
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
जवळच्या HDFC बँक शाखेला भेट द्या. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र सादर करा.
अर्ज भरून आवश्यक रक्कम जमा करा.
HDFC FD योजनेचे फायदे
सुरक्षित आणि स्थिर परतावा
बाजारातील चढ-उतारांपासून मुक्त, दीर्घकालीन स्थिर गुंतवणूक.
7.75% पर्यंत उच्च व्याजदर
इतर एफडी योजनांपेक्षा अधिक परतावा मिळतो.
सोपी अर्ज प्रक्रिया
ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पर्याय उपलब्ध.
टॅक्स बचत (5 वर्षांवरील FD साठी)
जर तुम्ही 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केली तर तुम्ही टॅक्स सेव्हिंग FD चा लाभ घेऊ शकता.
ही योजना फायद्याची का?
HDFC बँकेची सीनियर सिटीजन केअर एफडी योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित आणि आकर्षक व्याजदरासह दीर्घकालीन गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला स्थिर उत्पन्न आणि जोखीममुक्त परतावा हवा असेल तर ही एफडी योजना एक योग्य निवड ठरू शकते.