FD Interest Rate : एचडीएफसी बँकेने वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे, यासोबतच अनेक बँकांनी देखील त्यांच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे. सध्या HDFC बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर बंपर कमाई करण्याची संधी देत आहे.
तुम्ही जर HDFC बँकेचे ग्राहक असाल किंवा बँकेच्या कोणत्याही मुदत ठेवीमध्ये पैसे गुंतवायचे असतील, तर तुम्हाला या व्याजदरांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची FD चालवत आहे. बँकेने 3 फेब्रुवारी 2024 पासून नवीन दर लागू केले आहेत, चला बँकेच्या व्याजदरांबद्दल जाणून घेऊया…
HDFC बँकेचे FD चे व्याजदर
-7 दिवस ते 14 दिवस: (सामान्य नागरिक 4.75 टक्के); (ज्येष्ठ नागरिक – 5.25 टक्के)
-15 दिवस ते 29 दिवस: (सामान्य नागरिक 4.75 टक्के); (ज्येष्ठ नागरिक – 5.25 टक्के)
-30 दिवस ते 45 दिवस: (सामान्य नागरिक 5.50 टक्के); (ज्येष्ठ नागरिक – 6 टक्के)
-46 दिवस ते 60 दिवस: (सामान्य नागरिक 5.75 टक्के); (ज्येष्ठ नागरिक -6.25 टक्के)
-61 दिवस ते 89 दिवस: (नागरिक 6 टक्के); (ज्येष्ठ नागरिक -6.50 टक्के)
-90 दिवस ते 6 महिने: (सामान्य नागरिक 6.50 टक्के); (ज्येष्ठ नागरिक -7 टक्के)
-6 महिने 1 दिवस ते 9 महिन्यांपेक्षा कमी: (सामान्य नागरिक 6.65 टक्के); (ज्येष्ठ नागरिक -7.15 टक्के)
-9 महिने 1 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: (सामान्य नागरिक 6.75 टक्के); (ज्येष्ठ नागरिक -7.15 टक्के)
-1 वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी: (नागरिक 7.40 टक्के); (ज्येष्ठ नागरिक -7.90 टक्के)
-15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी: (सामान्य नागरिक 7.05 टक्के); (ज्येष्ठ नागरिक -7.55 टक्के)
लक्षात घ्या एचडीएफसी बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि 5 कोटी रुपयांपर्यंतच्या मोठ्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन दर 3 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत. बँक सर्वसामान्यांना ४.७५ टक्के ते ७.४० टक्के व्याज देत आहे.
त्याच वेळी, HDFC बँक आता ज्येष्ठ नागरिकांना 5.25 टक्के ते 7.90 टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवरील मानक दरांपेक्षा ५० बेसिस पॉइंट अतिरिक्त व्याज देत आहे.