HDFC Bank : नव्याने गृह कर्ज घेणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्हाला सुद्धा येत्या दिवाळीत नवीन घर खरेदी करायचं असेल तर तुम्हाला एचडीएफसी बँकेने मोठी गुड न्युज दिली आहे. एचडीएफसी ही देशातील सर्वाधिक मोठी प्रायव्हेट बँक. मार्केट कॅपिटलनुसार एचडीएफसी देशातील सर्वाधिक मोठ्या टॉप 10 कंपन्यांमध्ये समाविष्ट आहे.
ही बँक एसबीआयपेक्षाही मोठी आहे. दरम्यान याच देशातील सर्वाधिक मोठ्या बँकेने आपल्या ग्राहकांना दिवाळीच्या आधीच मोठी भेट दिली आहे. एचडीएफसीने गृहकर्जा सहित सर्वच प्रकारच्या कर्जांचे व्याजदर कमी केले आहेत. यामुळे जर तुम्हाला एचडीएफसी कडून होम लोन घ्यायच असेल तर हा काळ तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे.

खरे तर दिवाळीत अनेक जण नवीन घर खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी अनेकांनी बँकांकडे अर्ज सुद्धा दाखल केले असतील. दरम्यान जर तुम्हीही घरासाठी कर्ज घेणार असाल तर एचडीएफसी बँकेचा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे.
कारण की या बँकेने कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) कमी केले असल्याची माहिती समोर आली आहे. एम सी एल आर कमी केले आहेत म्हणजेच गृहकर्ज, वाहन कर्ज व वैयक्तिक कर्जाचे ईएमआय आता कमी होणार आहेत.
HDFC Bank ने वेगवेगळ्या कालावधीसाठी MCLR मध्ये 0.5 % पासून 0.15 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बँके कडून घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. हे नवीन दर 7 ऑक्टोबरपासून लागू होणार अशी माहिती बँकेचे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आता व्याजदरातील या कपातीनंतर बँकेचे नवीन MCLR दर 8.45% पासून 8.65% पर्यंत राहणार आहेत. बँका जवळ एम सी एल आर रेट कमी करतात किंवा वाढवतात तेव्हा याचा थेट परिणाम गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, कार कर्ज यांसारख्या फ्लोटिंग व्याजदरावर घेतलेल्या कर्जांवर होत असतो.
अर्थात तुमचे असेच फ्लोटिंग रेट वर कर्ज असेल तर तुम्हाला पण याचा फायदा होणार आहे. थोडक्यात एमसीएलआरवर आधारित कर्ज घेतलेल्या ग्राहकांचा ईएमआय कमी होणार आहे.