Health Insurance:- तुम्ही जर गरीब आणि मध्यमवर्ग कुटुंबातील असाल तर तुमच्याकरिता एक फायद्याची बातमी आहे व ही बातमी म्हणजे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी अगदी परवडणाऱ्या प्रीमियम दरामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली आहे व याकरिता पोस्ट ऑफिस विमा योजना 399 सुरू केली आहे. ही अतिशय महत्त्वाची योजना असून जर एखाद्याच्या कुटुंबात एखाद्याला अचानक आजार किंवा अपघात झाला तर उपचारांचा खर्च करणे सोपे जावे याकरिता ही योजना अतिशय महत्त्वाची आहे.
पोस्ट ऑफिस विमा योजना 399 चे फायदे कोणते?
या योजनेमध्ये जे व्यक्ती सामील होतील अशा व्यक्तीला जर एखादा आजार किंवा अपघात झाला तर या योजनेच्या माध्यमातून 50 हजार ते दोन लाखापर्यंतचे आरोग्य कव्हर मिळणार आहे. या माध्यमातून मिळणारे हे कव्हर उपचार, औषधे आणि हॉस्पिटलच्या खर्चासाठी दिले जाणार आहे. इतकेच नाही तर दुर्दैवाने पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाला किंवा त्याला अपघातात कायमचे अपंगत्व आले तर या योजनेच्या माध्यमातून कुटुंबाला आर्थिक मदत देखील मिळणार आहे.

या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेतून मिळणाऱ्या कव्हरमध्ये कुटुंबातील सदस्यांना देखील समाविष्ट केले जाऊ शकते. ही अतिशय साधी आणि सोपी अशी योजना आहे. अवघ्या 399 रुपयांच्या वार्षिक प्रीमियम मध्ये दोन लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण या माध्यमातून दिले जाणार आहे. त्यामुळे ही योजना देशातील प्रत्येक गरीब कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
या विमा योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर जास्तीचे कागदपत्र देण्याची गरज भासत नाही. तुम्हाला फक्त एक साधा फॉर्म आणि ओळखपत्र सादर करून या योजनेचा फायदा घेता येतो. पॉलिसीधारकाला तर एखादा आजार झाला किंवा त्याचा अपघात झाला तर ताबडतोब या माध्यमातून मदत मिळते. ही योजना देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे.