Health Insurance : बदलती जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. परंतु उपचारासाठी पैसे असतातच असे नाही. अनेकदा पैसे नसल्याने जीवही गमवावा लागत आहे. त्यासाठी आपल्याकडं एखादा विमा असणे खूप गरजेचे आहे.
अनेकांना टर्म इन्शुरन्स आणि लाइफ इन्शुरन्स यामधील फरक समजत नाही. त्यामुळे ते गोंधळून जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणे कोणताही विमा घेत असताना तुमच्या गरजा जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण संकटात येतो.

फरक घ्या समजून
मुदत जीवन विमा हा एक जीवन विमा पॉलिसीचा एक प्रकार असून अनेकदा लोक मुदत आणि जीवन विमा यामध्ये गोंधळून जातात. जाणून घेऊयात या दोघांमधला फरक . टर्म आणि लाइफ इन्शुरन्स या दोन्ही पॉलिसी मृत्यूवर संरक्षण देत असतात. टर्म पॉलिसी फक्त मृत्यू कव्हर देत असून लाइफ पॉलिसी काही परतावा देतात.
समजा एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांसाठी 1 कोटी रुपयांची मुदत विमा पॉलिसी घेतल्यास त्या व्यक्तीला 20,000 रुपये प्रीमियम भरावा लागतो. या दहा वर्षांत त्यांचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना एक कोटी रुपये दिले जातात. तसेच ही दहा वर्षानंतर पॉलिसी कालबाह्य होईल. म्हणजे फायदा होणार नाही.
याउलट, जीवन विमा पॉलिसी मृत्यू कवच तसेच परिपक्वता लाभ मिळतात. डेथ कव्हर म्हणजे तुमच्या मृत्यूवर कंपनीकडून जे फायदे देण्याचे वचन देण्यात आले आहे आणि पॉलिसी पूर्ण झाल्यावर तुम्हाला मिळणारा परतावा यालाच मॅच्युरिटी बेनिफिट असे म्हणतात. त्यामुळे आता लाइफ इन्शुरन्स असो वा टर्म, दोघांचाही उद्देश एकच आहे.
लवकरात लवकर फायदा घेतला तर होईल फायदा
टर्म इन्शुरन्स पॉलिसी ही तुमच्या पगाराचा बॅकअप असून जर कमावत्या व्यक्तीने अपघातात जीव गमवावा लागला तर घरातील कमाईचे साधनही संपते. ही पॉलिसी तुमच्या अनुपस्थितीत कुटुंबातील सदस्यांच्या गरजा लक्षात घेते. त्यामुळे हे लक्षात घ्या की विमा पॉलिसी कोणतीही असो, ती जितक्या लवकर विकत घेणे फायदेशीर आहे. खरं तर , वाढत्या वयानुसार, विमा पॉलिसीचा प्रीमियम महाग होतो. 25 वर्षे आणि 35 वर्षांच्या एकाच पॉलिसीच्या प्रीमियममध्ये 50-100 टक्के फरक असण्याची शक्यता आहे.
प्रीमियम म्हणजे काय?
विमा कंपनीकडून पॉलिसी अंतर्गत काही फायदे देण्याचे आश्वासन दिले जाते. या फायद्यांच्या बदल्यात, विमा कंपनीकडून काही शुल्क आकारत असते. याला प्रीमियम असे म्हणतात. ग्राहक त्यांच्या सोयीनुसार प्रीमियम पेमेंट टर्म निवडू शकतात.
उदाहरणार्थ, प्रत्येक महिन्याला पैसे भरायचे की वर्षातून एकदा, ते निवडणे ग्राहकाच्या हातात असून तुम्हाला तुमच्या गरजेनुसार 10 वर्षे, 20 वर्षे, 30 वर्षे मुदतीची पॉलिसी खरेदी करता येते. यापैकी बहुतेक टर्म इन्शुरन्स पॉलिसींचा प्रीमियम संपूर्ण टर्ममध्ये सारखाच असून सध्या अशा पॉलिसी लेव्हल टर्म पॉलिसीच्या नावाखाली उपलब्ध आहेत.
तर मिळतो प्रीमियम कमी
आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विमाधारकाचे आरोग्य, वय आणि आणखी किती वर्षे जगण्याची शक्यता आहे या आधारे प्रीमियमची रक्कम ठरवण्यात येते. ही पॉलिसी देण्यापूर्वी, विमा कंपनी विमाधारकाचा वैयक्तिक वैद्यकीय अहवाल पाहत असते. तसेच काही अनुवांशिक आजार आहे की नाही हे तपासण्यात येते.
त्यानुसार प्रीमियमची रक्कम ठरवण्यात येते. समजा एखादी व्यक्ती जितका निरोगी असेल तितका प्रीमियम कमी असतो. बऱ्याच वेळा लोक विमा कंपनीला या आजाराबद्दल सांगत नाहीत. त्यामुळे जरी तर विमा खरेदी करताना ते फायदेशीर असले तरी तुम्हाला जड जाऊ शकते.
विम्याचा दावा केल्यानंतर, कंपनी दाव्याची खरोखर योग्यता आहे की नाही याची तपासणी करत असते. समजा या तपासणीत असे दिसून आले की तुम्ही या आजाराची माहिती लपवली होती, तर तो विमा अर्ज रद्द करण्यात येतो.
मुदतीपासून करा शिफ्ट
समजा पॉलिसी सक्रिय असताना विमाधारक व्यक्तीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तर, त्याच्या कुटुंबातील सदस्यांना विम्याचे फायदे मिळतात. ही पॉलिसी संपल्यानंतर, विमाधारक व्यक्तीला विम्याचे कोणतेही फायदे दिले जाणार नाहीत. अनेक टर्म पॉलिसी परिवर्तनीय असतात.
म्हणजे, जर तुमची इच्छा असेल तर, तुम्ही टर्म इन्शुरन्स पॉलिसीचे कायमस्वरूपी जीवन किंवा सार्वत्रिक जीवन विम्यामध्ये रूपांतर करू शकता. तसेच प्रत्येक विमा कंपनीचे याबाबत वेगवेगळे नियम असून मुदतीचे जीवनात रूपांतर केल्यावर प्रीमियम वाढला जातो.













